बाजार समिती कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोडीत; पोलिसांची कारवाई

बाजार समिती कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोडीत; पोलिसांची कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik Agricultural Produce Market Committee) भ्रष्टाचाराविरोधात आणि आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून इदगाह मैदानावर (idgah ground) सुरू आंदोलन (Agitation) सुरू होते...

अखेर बाजार समिती कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन पोलिसांनी (Police) मोडून काढले आहे. तर उपोषणकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. बाजार समितीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत ईदगाह मैदानावर गेल्या पाच महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते.

हे आंदोलन मोडून काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. तर या आंदोलनाची दखल कोणीही घेतली नाही, किंवा याबाबत बाजार समितीने काही ठोस पाऊले उचलली. मात्र आता पोलीसांनीच हे आंदोलन उधळून लावले आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी पोलिसांना जाब विचारला मात्र पोलिसांनी कर्मचाऱ्यांकडे लक्ष न देता आंदोलन हटवण्याचे काम केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com