मार्कंडेय ऋषी शिखर
मार्कंडेय ऋषी शिखर
नाशिक

वणी : मार्कंडेय ऋषी पर्वत परिसर बंद

वनविभागाकडून खबरदारी

Gokul Pawar

Gokul Pawar

सप्तशृंगीगड । Saptsrungigad

मार्कण्ड ऋषी येथील उंच शिखरावर असलेलं मंदिर सोमवती अमावस्या तसेच धार्मिक स्थळावर गर्दी होऊ नये, यासाठी वनविभाग अधिकारी व कर्मचाऱ्याने मार्कण्ड ऋषी वरील डोंगराच्या रस्ता चारी बाजुने बंद केला आहे, असे आर.एफ.ओ. वसंत पाटील यांनी सांगितले. सदर करोना विषाणूचा प्रादुभाव असल्याने ग्रामीण भागात करोना रोग पसरत आहे. यामुळे वनविभाग कर्मचाऱ्याने खबरदारी म्हणून डोंगरी रस्ता बंद केला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्कंडेय पर्वतावर वन विभागाच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून कर्तव्यदक्ष वनाधिकारी, वसंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मार्कंडेय पर्वताच्या चहुबाजूने वन कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. सोमवती अमावस्येला या पर्वतावर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते.

वन कर्मचारी, वनपाल शंकर हिरे, वनरक्षक अशोक बागुल, विजया गायकवाड, दिनेश बस्ते व इतर कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. तरी भाविकांनी मार्कंडेय पर्वतावर गर्दी करु नये, असे आवाहन संजय मोरे, ए. सी.एफ नाशिक यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com