दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूचे भाव कडाडले

दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूचे भाव कडाडले

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

नवरात्रीचा उत्सव (Navratri Festival) यंदा अत्यंत मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असून देवीच्या दर्शनासाठी नाशिक शहर व शहराबाहेरील सगळीच मंदिरे भाविकांच्या गर्दीने (Devotees) गजबजली आहेत...

अष्टमी आणि नवमीला भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. याशिवाय दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. करोनाच्या दोन वर्षानंतर यंदा दसरा मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा होत असला तरी दसरा (Dasara) सण झेंडूच्या फुलांशिवाय साजरा होऊ शकत नाही.

यंदा झेंडूच्या फुलांचा (Marigold Flowers) बाजारात मोठा तुटवडा पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) व परतीच्या पावसाने झेंडूच्या फुलांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) झेंडूच्या विक्रीमध्ये प्रचंड तोटा जाणवणार आहे.

गेल्या दोन वर्षात करोनाच्या (Corona) महामारीमुळे सगळी मंदिरे बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांची लागवड अल्प प्रमाणात केली होती. यावर्षी मात्र करोनाची महामारी कमी झाल्याने नवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा होईल यासाठी झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. परंतु सततच्या आणि परतीच्या पावसाने झेंडूच्या फुलांचे नुकसान झाले.

पावसामुळे फुलांचे नुकसान झाले असले तरी झेंडू बाजारात आल्याचे पाहायला मिळत असून भाव वधारल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी २०० ते ३०० रुपये कॅरेटप्रमाणे झेंडू विकला गेला. आता मात्र ४०० ते ५०० च्या घरामध्ये झेंडू विकला जाणार असल्याचे शेतकरी व्यापारी वर्गाने सुचित केले आहे. तसेच मुंबई -पुणे प्रमाणेच नाशिकच्या बाजारातही फुलांचे दर वाढलेले दिसत आहेत.

तसेच शहरातील बाजारपेठेत फुले खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत असून यावर्षी झेंडूला महाराष्ट्रासह बाहेरील राज्यात देखील मागणी वाढली आहे .मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने झेंडूचे दर वाढले आहेत.

तर दसऱ्याच्या मुहूर्तावर बाहेरच्या जिल्ह्यातून किती आवक होते यावर झेंडूचे दर कमी जास्त होऊ शकतात असेही व्यापारी व शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील चांदवड, शेलु, पुरी ,मखमलाबाद, माडसांगवी ,मोहाडी, जानोरी आदी भागातून झेंडूंची फुले प्रचंड प्रमाणात विक्रीसाठी येत असतात.

दरम्यान, दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूची मागणी वाढत असल्याने दर वधारतील म्हणून आदल्या दिवशीच भाविकांनी पंचवटीतील (Panchvati) गणेशवाडी (Ganeshwadi) व बाजारपेठेत गर्दी केली आहे. ४०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत कॅरेट विकत घेऊन आपल्या घरावर आकर्षक माळा लावण्याचा भाविक प्रयत्न करत आहेत. तसेच हार फुलांची मागणी प्रचंड वाढली असून झेंडूच्या फुलांप्रमाणेच अष्टर, निशिगंध, लिली यासारख्या फुलांचे दरही २५ टक्क्याने वाढले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com