'या' मागणीसाठी नाशिक ते मुंबई अर्धनग्न पायी मोर्चा

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देणार निवेदन
'या' मागणीसाठी नाशिक ते मुंबई अर्धनग्न पायी मोर्चा

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Navin Nashik

परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर (criminality) नियंत्रण मिळविण्यासाठी अंबड पोलिस ठाण्याचे (Ambad Police Station) विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीत (Ambad Industrial Estate) स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करावी ही अनेकवर्षांची मागणी वारंवार आंदोलन (agitation) सह्यांची मोहीम करूनही अद्याप पूर्ण न झाल्याने

यासाठी स्थानिक नागरिकांसह नाशिक (nashik) ते मुंबई (mumbai) अर्धनग्न पायी मोर्चा (दि.६ डिसेंबर) काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांना निवेदन (memorandum) देणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर,

माजी नगरसेवक राकेश दोदे रामदास दातीर यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी दिली. यावेळी माहिती देतांना दातीर यांनी सांगितले कि, अंबड औद्योगिक वसाहतीलगत चुंचाळे दत्तनगर, संजीवनगर, अंबड लिंकरोड परिसरात दिवसेंदिवस नागरी वस्तीचा विस्तार होत असून या भागात गुन्हेगारी कारवायाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

गेल्याच आठवड्यात ७० वर्षीय वृद्धाचा खुन (murder) करून लुटमार केल्याची घटना घडली आहे. तसेच या भागात परप्रातीय संख्या वाढल्याने गुन्हेगारी (criminality) वाढली आहे. तसेच गोळीबार सारख्या घटना घडल्या आहेत. या भागात हाणामाऱ्या, कामगारांची लूट, सोनसाखळी चोरी, मोबाईल, पैसे हिसकावून घेणे, धमकी, मारहाणीसाखे प्रकार नित्याचेच झाले आहेत.

येथून अंबड पोलीस ठाणे (Ambad Police Station) आठ ते दहा कि मी अंतरावर असल्याने घटना घडल्यावर पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांना पोहोचण्यास विलंब होत असल्याने गुन्हा करून पळून जाण्यात गुन्हेगार यशस्वी होत आहेत. याशिवाय अंबड पोलीस ठाण्याचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे असूनही त्याप्रमाणात कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मर्यादा येत आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे आजतागायत पोलीस ठाण्याच्या निर्मितीचा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. पायी मोर्चाने मुंबईला जाऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार असल्याची माहिती साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोदे, रामदास दातीर यांनी दिली.

तरी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी येथील नागरिकांनी अर्धनग्न पायी मोर्चा मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन साहेबराव दातीर माजी नगरसेवक राकेश दोदे . रामदास दातीर, नितीन दातीर ,महेश दातीर ,शरद कर्डिले अरुण दातीर,त्र्यंबक मोरे, गोकुळ दातीर ,शांताराम, फडोळ आदींनी केले आहे

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com