मराठी साहित्य संमेलन गीत भेटीला; ऐकण्यासाठी इथे क्लिक करा

मराठी साहित्य संमेलन गीत भेटीला; ऐकण्यासाठी इथे क्लिक करा
Marathi Sahitya sammelan 2021

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक (Nashik) येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी (Akhil Bhartiy marathi sahitya sammelan 2021) शहरातील ज्येष्ठ गीतकार मिलींद गांधी (milind gandhi) यांनी संमेलन गीत तयार केले आहे. ज्येष्ठ संगीतकार संजय गीते (Musician Sanjay Gite) यांच्या मार्गदर्शनाखाली हे गीत स्वरबद्ध करण्यात आले आहे...

हे गीत आज, सोमवार (दि.८) रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास भुजबळ फार्म (Bhujbal Farms) येथे संमेलनाचे स्वागताध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian minister Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

नाशिकचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा इतिहास आणि आढावा घेणारे वैशिष्ट्यपूर्ण असे नाशिक साहित्य संमेलन गीत असल्याचे नामदार भुजबळ म्हाणाले.

या गाण्याची गीतरचना मिलिंद गांधी यांनी केली आहे. तर संगीत दिग्दर्शक म्हणून संजय गीते यांनी काम बघितले आहे.

गाण्याचे प्रमुख गायक संजय गीते हेच आहेत. तर समूहस्वरसाठी सौरभ कुलकर्णी, सागर कुलकर्णी, मयुरी निमोणकर, मृदुला कुलकर्णी व श्रावणी गीते यांचा समावेश आहे.

गाण्याचे बासरी वादन मनोज गुरव यांनी केले तर तबल्याची जबाबदारी बल्लाळ चव्हाण यांनी पेलली. संगीत संयोजन अविनाश लोहार तर ध्वनीमुद्रण सोर्स म्युझिक स्टुडिओ आणि ध्वनिमुद्रक सुमंत गीते यांनी केले. मास्टरिंगची महत्वाची धुरा शुभम जोशी यांनी सांभाळली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com