कालिदास कलामंदिरात 'मराठी आठव दिवस' उत्साहात

कालिदास कलामंदिरात 'मराठी आठव दिवस' उत्साहात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

'मराठी आठव दिवस' (Marathi remember day) नाशिकच्या (nashik) कालिदास कलामंदिरात (Kalidas Kalamandir) उत्साहात पार पडला. सांग कधी कळणार तुला..., मी डोलकर, दर्याचा राजा, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले..., एक धागा सुखाचा..., प्रभो शिवाजी राजा.. अशा आठवणीतल्या कप्प्यातील अजरामर गाण्यांच्या हिंदोळ्यावर नाशिककर रंगले.

स्वामीराज प्रकाशनतर्फे दर महिन्याच्या २७ तारखेला मराठी आठव दिवस साजरा करण्यात येतो. यावेळी या दिनानिमित्त शनिवारी नाशिकच्या कालिदास कलामंदिरात सत्कार्य फाउंडेशनच्या (Satakarya Foundation) वतीने आयोजित केलेल्या 'गंध स्वरांचा' या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमातून स्वरांची सुरेल बरसात झाली. मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाच्या प्रतिकृतीस पुष्पचक्र अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

येथील १८२ वर्षांची परंपरा असलेल्या नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. वाचनालयाचे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी यांनी हा सन्मान स्वीकारला. संत ज्ञानेश्वरांच्या 'मोगरा फुलला..' या अभंगाने सुरू झालेली सुरेल गाण्यांची मैफील उत्तरोत्तर रंगत गेली.

चोरीचा मामला मामा ही थांबला..., गोमू संगतीनं माझ्या तू येशील का..., गं साजणी..., मी डोलकर, दर्याचा राजा अशी जबरदस्त गाणी आणि त्याला तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नेहमीच राया तुमची घाई, येऊ कशी कशी मी नांदायला... छबीदार छबी, मी तोर्‍यात उभी, या रावजी बसा भावजी... या ठसकेबाज लावण्यांचा जबरदस्त तडका मिळाला. प्रसिद्ध निवेदिका समिरा गुजर हिने कार्यक्रमाचे उत्तम निवेदन केले.

पोलीस उपायुक्त रुपाली (Deputy Commissioner of Police Rupali) अंबुरे-खैरमोडे आणि महाराष्ट्राचा सुरेल आवाज माधव भागवत यांनी सुमधूर आवाजात, तर राजू जवळकर, अविनाश इनामदार, समीर शिवगर यांनी ढोलकी, तबला, सिन्थेसायझरवर साथ देत सादर केलेल्या गाण्यांना रसिकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या कडकडाटात मनमुराद दाद दिली.

यावेळी नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे कौतुक केले. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष, आयोजक बाबासाहेब गायकवाड (देशमुख), ज्येष्ठ पत्रकार रजनिश राणे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com