...अन् विद्यार्थी झाले लिहिते, आदिवासी विकास विभागाचा स्तुत्य उपक्रम

  मराठी भाषा गौरव दिन अनोख्या पद्धतीने साजरा
...अन् विद्यार्थी झाले लिहिते, आदिवासी विकास विभागाचा स्तुत्य उपक्रम

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

आदिवासी विकास विभागांतर्गत (Tribal Development Department) प्रकल्प कार्यालयात शैक्षणिक गुणवत्ता कक्ष स्थापन झाला आहे. या कक्षा अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. दि.२७ फेब्रुवारी अर्थात मराठी भाषा गौरव दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला..

कविवर्य कुसुमाग्रज (Kusumagraj) तथा विष्णू वामन शिरवाडकर (Vishnu Vaman Shirwadkar) यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या औचीत्यावर विद्यार्थ्यांच्या मराठी लेखन कौशल्यास वाव देणे, स्वत: मराठी कथा, काव्य, नाटक लिहावे यासाठी त्यांना प्रेरित करणे, सर्जनशील आणि चिकित्सक विचार करणे या २१ व्या शतकातील कौशल्यास वाव देणे हे उद्देश निश्चित करून सर्व शाळांमध्ये मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

...अन् विद्यार्थी झाले लिहिते, आदिवासी विकास विभागाचा स्तुत्य उपक्रम
‘EVM थेट सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केले जाते’; ज्येष्ठ माजी खासदाराचा खळबळजनक आरोप

आदिवासी विकास विभागाअंतर्गत असणाऱ्या सर्व शासकीय, अनुदानित आणि एकलव्य मॉडेल निवासी शाळा (Eklavya Model Residential School) येथील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कथा, कविता, नाटक यांचे शाळा स्तरावर प्रकाशन करण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

यावेळी विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या कथा, कविता यांचे सादरीकरण केले. राज्यातील सर्वच शाळांमधील (Schools) विद्यार्थ्यांनी ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला होता. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष , गावातील इतर उपस्थित मान्यवर यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.

“मराठी भाषा (Marathi language) गौरव दिन साजरा करताना विद्यार्थी अभिव्यक्तीला महत्व दिले. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कथा, कविता वाचल्यावर लक्षात येते की त्यांच्या डोक्यात किती भन्नाट आणि सर्जनशील विचार असतात.” अशी प्रतिक्रिया आदिवासी विकास विभागाच्या नाशिक येथील आयुक्त नयना गुंडे यांनी दिली.

...अन् विद्यार्थी झाले लिहिते, आदिवासी विकास विभागाचा स्तुत्य उपक्रम
आज खऱ्या अर्थानं...; सत्यजीत यांच्या 'त्या' ट्विटवर डॉ. सुधीर तांबेंची प्रतिक्रिया
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com