मराठ्यांच्या हक्कासाठी आमचा लढा - खासदार संभाजीराजे

मराठ्यांच्या हक्कासाठी आमचा लढा - खासदार संभाजीराजे
खासदार संभाजीराजे

नाशिक | प्रतिनिधी

मराठा समाजाने आज मूक आंदोलन केले आहे. नाशिकच्या पवित्र भूमीमध्ये आज शांततेत आंदोलन आले. आंदोलनाने वातावरण गडूळ होऊ नये, मराठ्यांच्या हक्कासाठी आमचा लढा असल्याचे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी केले. रावसाहेब थोरात सभागृहाच्या मैदानावर ते संबोधित करत होते...

खासदार बोसले म्हणाले की, आरक्षणासाठी पुनर्याचिका करणे पहिला मार्ग आहे. ३४२ अ च्या माध्यमातून आरक्षण राष्ट्रपती यांच्या माध्यमातून मिळू शकते. त्यावरदेखील विचार झाला पाहिजे.

राजर्षी शाहू महाराज संपूर्ण जगाचे होते. पिंपळगाव बसवंत येथील गणपतराव मोरे यांचे जिल्ह्यात त्यावेळी काम मोठे होते. तेव्हाही त्यांच्या पाठीमागे महाराज खंबीरपणे उभे होते. मविप्र संस्थेला महाराजांनी त्यावेळी देणगी दिली होती. आज संस्थेची व्याप्ती एवढी मोठी वाढल्याचे समाधान आहे.

नाशिकमध्ये छत्रपती खा. संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलनास सुरुवात झाली आहे. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यांसह सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना मराठा आरक्षणावर भुमिका मांडण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com