मराठा महासंघ कार्यकारिणी जाहीर

मराठा महासंघ कार्यकारिणी जाहीर

सुरगाणा। प्रतिनिधी Surgana

अखिल भारतीय मराठा महासंघ उत्तर महाराष्ट्र विभाग (Akhil Bharatiya Maratha Mahasangh North Maharashtra Division), नाशिक जिल्हा कार्यकारिणी जाहीर (Nashik district executive announced) करण्यात आली. नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी अशोक कदम (Ashok Kadam as Nashik Rural District President), महिला जिल्हाध्यक्षपदी अस्मिता देशमाने, युवक जिल्हाध्यक्षपदी निलेश मोरे आणि नाशिक शहराध्यक्षपदी संजय फडोळ यांची नियुक्ती करण्यात आली.

उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, उत्तर महाराष्ट्र विभागीय सरचिटणीस अमोल निकम आणि उत्तर महाराष्ट्र विभागीय युवक उपाध्यक्षपदी मनोज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. नाशिक जिल्हा कार्याध्यक्षपदी राजेंद्र शेळके, सरचिटणीसपदी प्रशांत औटे, चिटणीस सुभाष शेळके, उपाध्यक्ष सुरेश भामरे अशोक दुधारे, हेमंत मोरे, जिल्हा संघटक योगेश टिळे,

जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रकाश उखाडे, शहर सरचिटणीस अ‍ॅड. अनिल गायकवाड, उपाध्यक्ष अविनाश जाधव, शहरप्रवक्ता आणि प्रसिद्धीप्रमुख अविनाश वाळुंजे, शहर चिटणीस जितेंद्र चव्हाण, नाशिक मध्य चिटणीस सचिन इंगोले आणि महिला जिल्हा उपाध्यक्ष रोहिणी उखाडे आदींची निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीने पदाधिकार्‍यांची एकमताने निवड करण्यात आली व नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी सर्वांनी एकोप्याने आणि एकमताने कार्य करण्याचे ठरविण्यात आले. याप्रसंगी कमलेश पिंगळे, विश्वास चुंबळे, प्रसाद औटे, सनी पिंगळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश वाळुंजे यांनी मानले.

Related Stories

No stories found.