मराठा समाजाचे जागर गोंधळ आंदोलन

सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न :जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
मराठा समाजाचे जागर गोंधळ आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मराठा आरक्षण (Maratha Reservation) उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे मराठा आरक्षणकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून त्यांना या समितीवर दूर करून मराठा समाजाच्या प्रश्नांची जाण असलेल्या मंत्र्यांकडे जबाबदारी द्यावी, यांसह इतर मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाज वतीने सोमवारी (दि.१७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर गोंधळ घालण्यात आला.

विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. मराठा आरक्षण व इतर मागण्यासाठी दोन दिवसीय विधिमंडळचे अधिवेशन घ्यावे.

न्यायालयात व्हिसीद्वारे सुनावणी न घेता ती कोर्ट पूर्णपणे सुरु झाल्यावर घ्यावी, मराठा आरक्षण घटनेप्रमाणे दिले असल्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात घटनापीठाकडे चालवावे, ५० टक्यांपेक्षा अधिक आरक्षण दिलेल्या सर्व याचिका एकत्रित चालवाव्यात, मराठा समाजाचे इतर महत्त्वाचे विषय मंत्री वडेट्टीवार यांच्या कडे देऊ नये ते दुसऱ्या मंत्री महोदयांकडे द्या,

अण्णा साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळला 5 हजार कोटी निधी कर्ज वाटप साठी उपलब्ध करून द्या, आंदोलकांवरिल गुन्हे मागे घ्या, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बांधकामावरील न्यायालयातील स्थगिती उठवण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी,

पंजाबराव देशमुख वस्तीगृह योजना त्वरित सुरू करा, सारथी शिक्षण संस्था सुरळीत करा आदी मागण्याचा निवेदनात समावेश अाहे. मागण्या पूर्ण करता येत नसेल तर या सरकारने सत्तेतून बाजूला व्हावे असा इशारा देण्यात आला. यावेळी करण गायकर गणेश कदम राजू देसले अमित जाधव,शरद तुंगार सचिन पवार आदी उपस्थित होते.

मदतीचे स्वागत

मराठा आरक्षण चळवळीतील हुतात्मा झालेल्या शूरवीरना दहा लाख रुपये व नोकरीत सामावून घेण्याचा निर्णयाचे समाज बांधवांकडून स्वागत करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com