हिरव्यागार रानावर मोर धरतायेत 'ठेका'

हिरव्यागार रानावर मोर धरतायेत 'ठेका'

येवला | प्रतिनिधी | Yeola

पावसाळ्यात येवल्याच्या (Yeola) पूर्वेला ममदापूरकडे येणे म्हणजे दुग्धशर्करायोगच असतो. कारण, मेघराजाच्या वर्षावाने न्हाऊन निघालेली धरती, वातावरणातला सळसळणारा उत्साह, ताजी हवा आणि या अशा ‘मौसम मस्ताना’मध्ये हिरव्यागार माळरानावर डौलाने ठेका धरणारे मोर! (Peacock) ‘याची देही, याची डोळा पाहावा हा सोहळा! हे दुर्मिळ दृश्य परिसरात असंख्य मोर असल्याने सहजरित्या दिसून येते...

पाऊस (Rain) झाल्यामुळे ममदापूर (Mamdapur) परिसरात मोर आनंदाने नाचू लागले आहेत. ममदापूर गावाचे हे 'मयूरवैभव' टिकवण्यात गावकर्‍यांचा मोठा वाटा आहे.

शांत वातावरण व जैवविविधतेमुळे इथे पूर्वीपासूनच मोर वास्तव्यास आहेत. आपला राष्ट्रीय पक्षी असलेला हा देखणा मोर गावाचे वैभव आहे, तसेच भगवान कार्तिकेयाचे वाहनही आहे. या समजुतीमुळे गावकर्‍यांनी कधीही मोरांची शिकार केली नाही.

ममदापूर परिसरात असंख्य मोर आढळतात. त्यामुळे माळरानावर ते हमखास पाहायला मिळतात. मोराबरोबरच मोठ्या संख्येने लांडोरीदेखील पाहायला मिळतात. शेतात एकाच ठिकाणी अनेक लांडोरी दिसल्या की मोर जवळपासच आहे, असे समजले जाते.

याव्यतिरिक्त एकत्र उडणारे मोर-लांडोर, नाचणारे मोर-लांडोर, पिसं स्वच्छ करणारे मोर, झाडाच्या शेंड्यावर बसलेले मोर, अन्नाच्या शोधात फिरणारे मोर, प्रणयक्रीडा करणारे मोर-लांडोर अशा मोरांच्या अनेक दुर्मिळ हालचाली नेहमीच पाहायला मिळतात.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com