राज्यपाल कोश्यारींसमवेत अनेक मंत्री नाशकात

राज्यपाल कोश्यारींसमवेत अनेक मंत्री नाशकात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कृषी क्षेत्रात योगदान देणार्‍या व्यक्तींना राज्य सरकारद्वारे सन्मानित करण्यात आहे. सोमवारी (दि.2) हा कार्यक्रम होणार असून, त्यास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ) उपस्थित राहणार आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठात ( University of Health Sciences )होणार्‍या या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आणखी काही मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे.

दरम्यान, राज्यात कृषी, फलोत्पादन व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना कृषी विभागातर्फे गौरविण्यात येते. त्यानुसार येत्या सोमवारी नाशिकमध्ये हा सोहळा होत असून, कृषी विभागामार्फत 2017, 2018 आणि 2019 या तीन वर्षांचे पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या येणार हस्ते पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पालकमंत्री छगन भुजबळ, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादा भुसे, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम व फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. साधारण अर्धा डझन मंत्री नाशिकमध्ये येत असल्याने प्रशासनाची जोरदार तयारी सुरु असल्याचे चित्र सर्वत्र आहे.

Related Stories

No stories found.