‘प्रभारी राज’मुळे शिक्षण विभागातील अनेक फाईल्स प्रलंबित

‘प्रभारी राज’मुळे शिक्षण विभागातील अनेक फाईल्स प्रलंबित
जिल्हा परिषद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

माध्यमिक शिक्षणाधिकारीपदाचा (secondary education officer) तात्पुरता पदभार पुष्पावती पाटील (Pushpavati Patil) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, पाटील या फाईल्सवर स्वाक्षरी करण्यासाठी हात आखडता घेत असल्याने विभागातील असंख्य फाईल्सवर धुळ साचली असल्याची तक्रार शिक्षकांनी (Teachers) केली आहे...

माध्यमिक शिक्षणाधिकारी बदलल्यानंतरही या विभागाचा कारभार मात्र बदलण्याचे नाव घेत नाही, असे चित्र आहे. प्रभारी शिक्षणाधिकारी पाटील या फाईल्सवर स्वाक्षरी करत नसल्याने
शिक्षण विभागाचे कामकाज अत्यंत संथ गतीने सुरु आहे.यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

कळवण तालुक्यातील (Kalvan Taluka) शाळेला 20 टक्के अनुदानास मान्यता देण्यासाठी 8 लाख रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर (Dr.Vaishali Zankar) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (acb) ताब्यात घेतले.

त्यानंतर शिक्षण विभागाने त्यांना निलंबित करुन या विभागाचा कारभार सहायक शिक्षण उपसंचालक पुष्पावती पाटील यांच्याकडे सोपवला आहे. सप्टेंबर महिन्यात त्यांनी या विभागाची सूत्रे हाती घेतली. मात्र, अद्याप प्रलंबित फाइल्स जशाच्या तशा पडून आहेत.

त्यातील काही फाईल्स या वादातील असल्यामुळे त्यांच्याकडे फिरकूनही पाहिले नाही. फक्त शिक्षक व शिक्षकेतर सेवकांचे वेतन बिलांवर त्या स्वाक्षरी करत आहेत. वैद्यकीय बिले, शाळांच्या मान्यतेचे प्रस्ताव, मुख्याध्यापकांचे प्रस्ताव अशी प्रकरणे त्यांनी नजरेआड केल्यामुळे या विषयांचा शेकडो फाईल्स विभागातच पडून आहेत.

आता त्यांच्या दालनात फाईल्स ठेवायलाही जागा शिल्लक न राहिल्याने सेवक मिळेत तेथे फाईल्स ठेवत आहेत. त्यामुळे फाईल्स गहाळ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण संस्थाचालक यांच्याशी निगडीत अनेक फाईल्स प्रलंबित असल्याने शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com