पीक विमा योजना
पीक विमा योजना
नाशिक

अनेक शेतकरी पीक विमा अर्ज भरण्यापासून वंचित

मुदतवाढ देण्याची मागणी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी विमा भरण्याची मुदत संपली. मात्र, करोनामुळे अनेक ठिकाणी असलेले लॉकडाउन, ग्रामीण भागात सर्व्हरची समस्या, उताऱ्यावरील अपुऱ्या नोंदी, ऑनलाइन माहितीतील गोंधळ, जनसुविधा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक या सर्व अडचणींमुळे अनेक शेतकरी अर्ज भरण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

शुक्रवारी (दि.३१)रात्री १२ वाजेपर्यंत विमा प्रस्ताव सादर करण्याचे काम सुरु होते. मात्र, करोना विषाणूच्या प्रसारामुळे विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवशी मोठी गर्दी केल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली.

त्यातच ग्रामीण भागात सर्व्हर डाऊनची समस्या कायम होती. त्यामुळे कामात सतत अडथळा येत होता. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन अनेक जनसुविधा केंद्र चालक विमा प्रस्तावासाठी २०० ते ३०० रुपये घेत होते. तसेच ऑनलाइन माहितीतील गोंधळ, उताऱ्यातील चुकीच्या नोंदी यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. शुक्रवारी जिल्ह्यात जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर केले.

शेतकऱ्यांना आल्या या अडचणी 

* शुक्रवारी प्रस्ताव सादर करण्यासाठी मोठी गर्दी 

* अनेक ठिकाणी ऑनलाइन प्रक्रिया संथ 

* सातबारावरील अपुऱ्या नोंदीमुळे अडचणी 

* प्रशासनाचे आदेश असतानाही बॅंकांचा ऑफलाइन

* प्रस्ताव स्वीकारण्यास नकार 

* गावांची नावे नसल्याने अडचणी 

* मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com