कडक पोलीस बंदोबस्त; अनेक कारखाने बंद

कडक पोलीस बंदोबस्त; अनेक कारखाने बंद

उद्योजकांकडून कामगारांना बोलावणे स्थगित

सातपूर । प्रतिनिधी

जिल्हाधिकार्‍यांनी काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले असले तरी पोलीस यंत्रणेच्या कडक बंदोबस्तामुळे उद्योजकांनी कामगारांना बोलावणे स्थगित करून कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा प्रशासनाने उद्योगक्षेत्राला कारखाना आवारात निवासाची व्यवस्था करणे अथवा दोन किलोमीटर परिसरात कामगारांना ठेवण्यास मुभा दिल्याने उद्योगक्षेत्र सुरळीत चालू राहणे शक्य होते. जिल्हा प्रशासनाने सवलत दिली आहे.

मात्र दुसरीकडे पोलिस प्रशासनाने संचारबंदीवर कडक नियोजन केले असल्याने नाहक कामगारांची अडचण निर्माण करण्यापेक्षा उद्योग बंद ठेवण्याकडेे उद्योजकांचा कल दिसून आला. त्यामुळे बुधवारी सकाळी उद्योगक्षेत्र सुरू करण्यासाठी आलेल्या उद्योजकांनी उत्पाादन प्रक्रिया बंद ठेवण्याचा निर्णय घेत कारखाने बंद केले. नागरी वसाहत, बाजारपेठांसह आता उद्योगक्षेत्रही बंद राहणार असल्याचे चित्र आहे.

जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनची घोषणा केली यात काही चुकीचे नाही. मात्र ही घोषणा राज्यासाठी असणे संयुक्तिक ठरले असते. शासनाने लघु व मध्यम उद्योजकांना लॉकडाऊन काळासाठी इन्सेंटिव्ह म्हणून व्याजदरात सवलत द्यावी. तसेच लेबर वेल्फेअरच्या माध्यमातून जमा होणार्‍या निधीच्या बदल्यात या क्षेत्रातील कामगारांच्या खात्यात मानधन द्यावे.

मंगेश पाटणकर, माजी अध्यक्ष निमा

जिल्हा प्रशासनाने उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली. दोन किलोमीटर परिसरात कामगारांची वाहतूक करणे मान्य केले. मात्र दुसरीकडे पोलिस प्रशासनाने नाकाबंदी करून संचारबंदीचा बडगा उगारला आहे. पोलीस प्रशासनाने कामगारांना ओळखपत्रावर जाण्यास परवानगी दिल्यास उद्योग क्षेत्र सुरू होण्यास अडचण राहणार नाही.

वरुण तलवार, अध्यक्ष आयमा

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com