शिक्षक प्रलंबित प्रश्नांना न्याय द्याः थोरात

राज्याध्यक्ष वाजे यांना सत्कार
शिक्षक प्रलंबित प्रश्नांना न्याय द्याः थोरात
Keswani9406842200

सिन्नर । वार्ताहर Sinnar

प्राथमिक शिक्षकांच्या (Elementary teacher) अनेक मागण्या प्रलंबीत असून या मागण्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री (CM), शिक्षण मंत्री (Minister of Education) व ग्रामविकास मंत्री (Minister for Rural Development) यांचेबरोबर संघटनेची बैठक लावावी व राज्यातील प्राथमिक शिक्षकांना न्याय मिळवून द्यावर असे आवाहन प्राथमिक शिक्षकांचे नेते संभाजीराव थोरात यांनी केले.

प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्याध्यक्षपदी अंबादास वाजे यांची निवड झाल्याबद्दल शिक्षक संघाच्या (Teachers union) तालुका शाखा व राज्य दिव्यांग कर्मचारी व अधिकारी संघटनेच्यावतीने (State Disabled Employees and Officers Association) नर्मदा लॉन्सवर आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

खासदार हेमंत गोडसे (mp hemant godse) यांच्या हस्ते वाजे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे (mla sudhir tambe), माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, नुतन सरचिटणीस आबासाहेब जगताप, नगराध्यक्ष किरण डगळे, पंचायत समितीच्या सभापती रोहिणी कांगणे, सदस्या संगिता पावसे उपस्थित होते. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्यासाठी चर्चा घडवून आणावी,

पती-पत्नी एकत्रीकरणाच्या बदल्या या नियमानुसार होऊन पती आणि पत्नीला एकाच ठिकाणी किंवा जवळच्या अंतरावर बदली मिळावी, 2005 नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा (Old pension plans) लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाकडे वकीली करण्याचे आवाहन थोरात यांनी व्यासपिठावरील लोकप्रतिनिधींना केले.

वाजे यांना प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष पद मिळालं ही कुणाची मेहरबानी नाही तर वाजे यांनी संघटनेसाठी केलेली मेहनत, शिक्षकांच्या प्रश्नांना आजपर्यंत दिलेला न्याय यामूळे मिळाले आहे. त्यांचा राज्यभर असलेला जनसंपर्क, त्यांची काम करण्याची हातोटी यामुळे त्यांना राज्याध्यक्ष पद बहाल करावे लागले असल्याचे ते म्हणाले.

संघटनेच्या 107 वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच नाशिकला (nashik) अध्यक्षपद दिल्याबद्दल खा. गोडसे यांनी संघटनेच्या नेत्यांचे आभार मानले. वाजे हे अतिशय संयमी नेतृत्व असून ते निश्चितपणे पदाला न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाजे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे हे मी बघितले आहे. लोकांच्या भावना जाणणारे सध्या शासन आहे.

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करु असे डॉ. तांबे म्हणाले. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेने माझ्यावर जबाबदारी टाकली आहे. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ते प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष वाजे यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले.

आबासाहेब जगताप, राजाभाऊ वाजे, उदय सांगळे यांनीही मनोगत व्यक्त केले. संजय भोर यांनी प्रास्ताविकांत संघटनेच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. संजय नन्नावरे यांनी सुत्रसंचलन केले. आभार मनोहर आव्हाड यांनी मानले. यावेळी राज्यभरातील शिक्षक संघाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com