मांत्रिकाचा विवाहितेवर अत्याचार

संगमनेर तालुका पोलिसांची मांत्रिकाला अटक
मांत्रिकाचा विवाहितेवर अत्याचार

संगमनेर । प्रतिनिधी

एका पंच्चावन्न वर्षीय मांत्रिकाने एका 45 वर्षीय विवाहितेला भूतबाधा झाल्याची भीती दाखवून मध्यरात्री तिला दारु पाजून, तिला शेतात नेऊन अत्याचार केला. जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुका पोलिसांनी मांत्रिकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत 45 वर्षीय पीडितेने संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात राहणाऱ्या एका 45 वर्षीय विवाहितेच्या भावाने आपली बहीण सतत अशक्त राहते, तिला चक्कर येतात या कारणाने पाच वर्षांपूर्वी पारेगाव बु. येथील भोंदू मांत्रिक सावित्रा बाबुराव गडाख याच्याकडे आणले .त्यानंतर संबंधित पीडितेने आपल्या घरी जाऊन त्याप्रमाणे केले असता काही दिवस तिला आराम वाटल्यासारखे जाणवले.

एप्रिल मध्ये संबंधित विवाहितेचे दुखणे वाढल्याने 23 एप्रिल रोजी त्यांनी बाबाला फोन करून त्याबाबत सांगितले. त्यावर बाबाने दारूच्या बाटल्या, भेळीचा पुडा व विडीचे बंडल घेऊन येण्यास सांगितले. त्यासाठी तिला दारु पाजावी लागेल, असे सांगून त्याने बळजबरीने पीडितेचे दोन्ही हात धरून तिला दारू पाजली. त्यानंतर त्याने दिला एकटीलाच आपल्या शेतातील पोल्ट्री फार्मच्या पाठीमागील बाजूस नेले व तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले. तुला दोनवेळा माझ्याकडे यावे लागेल. असे सांगून तो घराच्या दिशेने निघून गेला.

या घटनेने घाबरलेली पीडिता बराच वेळ तिथे तशीच पडून होती. त्यानंतर पहाटे 5 वाजता घरी पोहोचल्यानंतर ती घरात एकटीच रडत बसल्याने तिच्या पतीने तिच्याकडे विचारणा केली. त्यानंतरही तिच्या मनातून मांत्रिक बाबाची भीती जात नसल्याने यादरम्यान तिने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. मात्र तिच्या पतीने पाहिल्याने पुढील अनर्थ टळला.

सोमवारी दुपारी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवांदे-पगार यांच्याशी संपर्क साधून घडला प्रकार कथन केला. त्या नंतर संबंधित 45 वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून पारेगाव बु. येथील सावित्रा बाबुराव गडाख या 55 वर्षीय भोंदू मांत्रिका विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सावित्रा गडाख याला पारेगाव बुद्रुक येथील त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com