Nashik News : "मराठा आरक्षणाला विरोध केला तर..."; मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा

Nashik News : "मराठा आरक्षणाला विरोध केला तर..."; मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा

नाशिक | Nashik

राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राजकारण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज मंत्री छगन भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याआधी आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा भुजबळांवर हल्लाबोल करत त्यांना इशारा दिला...

Nashik News : "मराठा आरक्षणाला विरोध केला तर..."; मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा
Shivsena Crisis : खरी शिवसेना कुणाची? ठरवण्यासाठी योग्य पुरावे सादर करा; विधीमंडळ सचिवांची शिंदे-ठाकरेंना नोटीस

यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, "छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) माझ्या एकट्याच्या विरोधात बोलतात, म्हणून आम्ही बोललो. आता ते म्हणतात की, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, आम्हाला तेच पाहिजे होते. विनाकारण कोणाला टार्गेट करण्याचा माझा धंदा नाही. तसेही आरक्षण देऊ नका, असे बोलणारे तुम्ही कोण? असा सवाल करत कुणी मराठा आरक्षणाला विरोध केला तर सोडणार नाही, मग तो कुणीही असो, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Nashik News : "मराठा आरक्षणाला विरोध केला तर..."; मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा
Pankaja Munde : पंकजा मुंडे कोणता निर्णय घेणार? समर्थकांसह राज्याचे लक्ष

पुढे बोलतांना ते म्हणाले की, "छगन भुजबळ यांनी स्वतः सांगितले पाहिजे, गरीब मराठ्यांना (Poor Maratha) आरक्षण मिळू द्या. कारण छगन भुजबळ यांना पाच मराठ्यांनी तरी मदत केली, त्याची थोडीशी जाण ठेवून तरी गोरगरीब मराठ्याना आरक्षण द्या, असे म्हटले पाहिजे. त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना मदत करणारा सगळा मराठा समाज त्यांच्यावर नाराज होत आहे. ते इतका मराठा समाजाचा द्वेष का करतात, यासाठी मराठा समाजाने त्यांना मोठे केले का? छगन भुजबळ उच्च दर्जाचे सर्वात मोठे नेते आहेत, आम्ही कधी त्यांना तुम्ही वेगळ्या जातीचे आहेत. आमच्या बाप जाद्याने एकदा तरी त्यांना मदत केली असेल. आम्हीही ओबीसीत आहे, तुम्ही तुमचं खा, आम्हाला आमचे मिळू द्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

Nashik News : "मराठा आरक्षणाला विरोध केला तर..."; मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा
MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर 'या' तारखेला एकत्रितपणे होणार सुनावणी

दरम्यान, मनोज जरांगे पाटील गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्र (Maharashtra) दौरा करत आहेत. काल संध्याकाळी त्यांनी नाशिक शहरात दाखल होत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांची भेट घेतली. यानंतर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर बसलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेत मराठा बांधवाना संबोधित केले. त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांची येवल्यात सभा होत आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik News : "मराठा आरक्षणाला विरोध केला तर..."; मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा
Supriya Sule : "...तर करारा जवाब दिला असता"; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेनंतर सुप्रिया सुळेंचे भुजबळांना प्रत्युत्तर
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com