मनमाडचा पाणीप्रश्न सुटणार; जलशुद्धीकरण केंद्राला मान्यता

मनमाडचा पाणीप्रश्न सुटणार; जलशुद्धीकरण केंद्राला मान्यता

मनमाड । प्रतिनिधी Manmad

शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात आणणार्‍या करंजवन पाणी पुरवठा योजनेसाठी (Karanjavan Water Supply Scheme) महत्वपूर्ण असलेल्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रासाठी (Water Treatment Plant) जमीन खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी हिरवा कंदील दिला आहे,

अशी माहिती आ. सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी दिली. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशामुळे मेसनखेडे भागातील जमीन भूसंपादन करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्यामुळे करंजवन योजनेच्या कामाला गती मिळणार असल्याचे सुतोवाच आ. कांदे यांनी केले.

जिल्ह्यात मालेगावनंतर (malegaon) सर्वात मोठे मनमाड शहर (manmad city) असून रेल्वेचे जंक्शन (Railway junction), ऑयल कंपन्याचे इंधन डेपो, आशिया खंडात क्रमांक दोनचा मानला जाणारा भारतीय अन्न महामंडळाचा (Food Corporation of India) धान्य साठविणारे गोदाम, ब्रिटीश कालीन रेल्वेचा वर्कशॉप आदीमुळे या शहराची एक आगळीवेगळी ओळख असली तरी पाणी टंचाईचे (Water scarcity) माहेर घर म्हणून देखील या शहराला ओळखले जाते गेल्या 35 ते 40 वर्षापासून शहरातील नागरिक भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहे.

पाण्याअभावी या शहराचा विकास देखील खुंटला आहे. नगरपरिषद (nagar parishad), विधानसभा (Assembly), लोकसभा (Lok Sabha) या सर्व निवडणुकीत पाणी टंचाई (Water scarcity) हा मुद्दा नेहमी प्रचाराच्या अग्रस्थानी राहिला आहे. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आम्हाला निवडून द्या तुमचा पाणी प्रश्न सोडवतो असे आश्वासन दिले होते मात्र त्यानंतर देखील समस्या कायम होती हे विशेष.

विधानसभा निवडणूक (Assembly Elections) प्रचार सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) आले होते त्यावेळी त्यांनी तुम्ही सुहासला निवडून द्या तुमचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी मी घेतो असे वचन दिले होते. या वचनाची पुर्तीसाठी करंजवन योजनेसाठी आपण सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता. तब्बल 350 कोटीच्या या योजनेला मंजुरी मिळविण्यात आपणांस यश आल्याचे आ. कांदे यांनी सांगितले.

योजना मंजूर झाली असली तरी सर्वात मोठी अडचण नवीन जलशुद्धीकरण केंद्रासाठी (Water Treatment Plant) लागणार्‍या जागेची होती अखेर शहरापासून जवळ असलेल्या मेसनखेडे परिसरात 2 हेक्टर जागेची पाहणी करण्यात आली. जागा खरेदी करण्यासाठी शासन आणि संबधित विभागाकडे सतत पाठपुरवा केला त्याला यश आले असून जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी 1 कोटी 57 लाख हजार रुपयाच्या निधी खर्च करण्यासाठी पालिकेला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

करंजवन योजनेसाठी हा पहिला टप्पा महत्वाचा होता तो पार केला असून पुढील सर्व टप्पे देखील पार करून लवकरात लवकर योजना पूर्ण कशी होईल यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आ. कांदे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com