मनमाडनामा: चार दशकांचे पाणीटंचाईचे ग्रहण ‘करंजवन’व्दारे सुटले

मनमाडनामा: चार दशकांचे पाणीटंचाईचे ग्रहण ‘करंजवन’व्दारे सुटले

मनमाड । बब्बू शेख | Manmad

गत 40 वर्षापासून पाणीटंचाईच्या (water scarcity) समस्येतून कायमस्वरूपी मुक्ततेची वाट पाहत असलेल्या मनमाडवासियांना आ. सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांच्या सातत्याचे पाठपुराव्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

नुकत्याच मनमाड (manmad) दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी हिंदूहृदय सम्राट असे नामकरण करत पावणे तीनशे कोटीची करंजवन पाणी पुरवठा योजनेला (Karanjavan Water Supply Scheme) हिरवा कंदील दिल्याने या योजनेची निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आल्याने पाणीटंचाईचे ग्रहण एकदाचे सुटले, अशी उत्स्फुर्त प्रतिक्रिया मनमाडकरांतर्फे व्यक्त केली जात आहे.

पाणीटंचाई (water scarcity) व मनमाड (manmad) असे जणू समीकरणच गत चार दशकांपासून येथे निर्माण झाले होते. पाणीटंचाई दूर होण्यासाठी अनेक योजना मंजूर केल्या गेल्या. परंतू अटी-शर्तीच्या गतीरोधकासह या-ना-त्या कारणाने या योजना अपुर्णच राहिल्याने पाणीटंचाईपासून मनमाडकरांची मुक्तता काही होवू शकली नव्हती. यापुर्वीच्या योजनांना आलेला अडसर लक्षात घेत आ. सुहास कांदे यांनी करंजवन योजनेमध्ये काहीही अडसर राहणार नाही याची दक्षता घेतली.

टेंडर (Tender) भरणार्‍या ठेकेदाराला जर वस्तुंच्या किंमत वाढल्यास त्याप्रमाणात त्याला वाढीव रक्कम मिळावी तसेच मनमाड पालिकेची (Manmad Municipality) आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने या योजनेसाठी भरावी लागणारी लोकवर्गणी उपलब्ध होणार कशी? असा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे आ. कांदे यांनी ही आर्थिक कोंडी देखील यशस्वीरित्या फोडण्याचे काम केले. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री शिंदे स्वत: मनमाड दौर्‍यावर आले असल्याने त्यांनी पालिकेच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव करून दिली.

वर्षोनुवर्ष पाणीटंचाईच्या चक्रव्युहात अडकलेल्या मनमाडवासियांना बाहेर काढण्यासाठी जनहिताचा निर्णय घेत या योजनेसाठी भरावी लागणारी लोकवर्गणी शासनाने भरावी असे साकडे आ. कांदे यांनी घातले असता ही मागणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पुर्ण करत लोकवर्गणी शासन भरेल असे आश्वासन देत घोषणा देखील केल्याने या योजनेसाठी येणारे अडथळे दूर झाल्याने करंजवन योजना (Karanjavan Scheme) वेळेवर आणि शंभर टक्के पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरातील सव्वालाख नागरिकांची पाणी टंचाईतून (water scarcity) केवळ सुटकाच होणार नाही तर शहराच्या खुंटलेल्या विकासाचा मार्ग देखील मोकळा होणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. 40 वर्षात जे जमले नाही ते आ. कांदे यांनी केवळ अडीच वर्षात करून दाखवत आपल्या आश्वासनाची पुर्तता केली आहे.

मनमाड शहराचा इतिहास फार मोठा नसला तरी देशाला स्वातंत्र्य मिळावा यासाठी शहरातील सर्वजातीधर्मांच्या लोकांनी लढ्यात सहभाग घेत तुरूंगवास देखील भोगला आहे. उपलब्ध माहितीनुसार 19 व्या शतकात शहराची लोकसंख्या साडेसात हजार इतकीच होती त्यावेळी खाजगी आणि सार्वजनिक विहिरीतून पाणीपुरवठा (water supply) केला जातो. लोकसंख्या वाढू लागल्याने इंग्रजांच्या काळात 1928 साली पालिकेची स्थापना झाली असली तरी पाणी पुरवठा हा सार्वजनिक विहिरीतून केला जात होता त्यांतर 1971 साली शहरा पासून 4 किमी अंतरावर वागदर्डी धरण (Wagdardi Dam) बांधण्यात आले त्यातून शहराला गल्ली-गल्लीत स्टँण्डपोष्ट उभारून पाणी पुरवठा करण्यात येत होता.

1974 साली थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक (election) झाली त्यात कॉ.माधवराव गायकवाड निवडून आले आणि त्यांनी नळाद्वारे पाणी पुरवठा योजना (Water Supply Scheme) सुरु केली होती. एकीकडे झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, कमी पाऊस यामुळे वागदर्डी धरण भरत नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचे पाहून 1979 साली पालखेड पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली तरी पाणी टंचाई दूर झाली नाही. 2014 नंतर वाढीव पाणीपुरवठा योजने अंतर्गत पाटोदा साठवणूक तलावाची क्षमता वाढवून 25 दशलक्ष घनफूट करण्यात आली. दोन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येवून देखील टंचाई काही दूर झाली नाही उलट दिवसेंदिवस तिची तीव्रता वाढत गेली.

पावसाळा, हिवाळा असो किंवा उन्हाळा नागरिकांना 40 वर्षात कधीच रोज तर सोडाच आठवड्यातून एक वेळ देखील मिळालेले नाही. पाणी टंचाईचा फटका शहराच्या विकासावर बसला. रेल्वे जंक्शन असून येथे उद्योग धंदे आले नाही त्यामुळे बेरोजगारी वाढली. पाणी टंचाईला वैतागून सुमारे 10 हजारापेक्षा जास्त नागरिकांनी शहराला कायमचा रामराम ठोकून निघून गेले. गेल्या 40 वर्षात सर्वच राजकीय पक्षांनी पाण्याच्या प्रश्नावर लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुका लढविल्या. निवडून गेलेले खासदार, आमदार यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले असले तरी पाणीटंचाई दूर होवू शकली नाही ही वस्तुस्थिती आजही नाकारता येणारी नाही.

तीन वर्षापुर्वी विधानसभा निवडणुकीत सुहास कांदे यांनी देखील संधी दिल्यास पाणीप्रश्न नक्की सोडवेल, असे आश्वासन जनतेला दिले होते. 40 वर्षे इतरांना आजमावून पाहिले आता मला संधी देवून पाहा निराशा पदरी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिल्याने मनमाडवासियांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात घातली. मनमाडची पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी करंजवन योजनेशिवाय पर्याय नाही. शेकडो कोटीची योजना असली तरी तीच टंचाई दूर करू शकते हे हेरत आ. कांदे यांनी शासन दरबारी करंजवन योजनेचा पाठपुरवा सुरू केला होता.

संबंधित मंत्र्यांकडे योजनेसाठी तगादा लावलाच परंतू तत्कालीन नगरविकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सासत्याने साकडे घालणे सुरू केले होते. गत अडीच वर्षापासून या योजनेसाठी त्यांनी केलेल्या अथक पाठपुराव्यामुळेच करंजवन योजनेची निविदा प्रसिद्ध होवू शकली आहे. ही वस्तुस्थिती नाकारणे धाडसाचे ठरेल. करंजवन योजनेस मंजुरी मिळून कामाची निविदा देखील प्रसिध्द झाली आहे.

त्यामुळे काम युद्धपातळीवर होवून वेळेवर ही योजना पूर्ण कशी होईल यासाठी जातीने लक्ष घालणार असल्याचे सुतोवाच आ. कांदे यांनी केले आहे. मनमाडला मुबलक पाणी उपलब्ध झाल्यास रेल्वे आणि रोड मार्गाने लागणारी दळवळणाची साधने पाहता औद्योगिक वसाहत देखील येथे कार्यान्वित होवून बेरोजगार हाताना काम मिळू शकणार आह. पाणीटंचाईमुळे शहराच्या बंद झालेल्या विकासाच्या वाटा नक्कीच मोकळ्या होवू शकणार आहे. त्यामुळे करंजवन योजनेचे काम लवकरच पुर्णत्वास येवो, अशी अपेक्षा मनमाडवासिय बाळगून आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com