मनमाड पाणी टंचाई मिटणार; 78 खेडी पाणीपुरवठा योजनेस ‘वर्क ऑर्डर’

मनमाड पाणी टंचाई मिटणार; 78 खेडी पाणीपुरवठा योजनेस ‘वर्क ऑर्डर’

मनमाड । प्रतिनिधी | Manmad

अखेर आ. सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी केलेले अथक प्रयत्नाना यश आले असून मनमाड शहरातील (manmad city) सव्वालाख नागरिकांची पाणी टंचाईतून (Water scarcity) कायमची सुटका आणि शहराचा कायापालट करणारी बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजनेचा (Balasaheb Thackeray Karanjavan Water Supply Scheme)

कार्यारंभ आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते आ. कांदे यांच्या मार्फत योजनेचे ठेकेदार इगल कन्स्ट्रक्शन (Contractor Eagle Construction) चे प्रतिनिधी विनय चूक यांना देण्यात आले.

316 कोटीच्या या योजने सोबत 235 कोटीच्या नांदगाव मतदार संघातील (Nandgaon Constituency) 78 खेडी पाणीपुरवठा योजनेच्या (78 Village Water Supply Scheme) कामाची देखील वर्क ऑर्डर (Work order) ही यावेळी देण्यात आली आहे. राज्य शासनाने मनमाडसह नांदगाव मतदार संघासाठी तब्बल 551 कोटीच्या पाणी पुरवठा (water supply) केवळ मंजूरच केल्या नाही तर त्यासाठी निधीची (fund) तरतूदही केली आहे.

आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हस्ते ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली असून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह इतर सर्व मंत्री, अधिकार्‍यांचा ऋणी असल्याचे मत आ. सुहास कांदे यांनी व्यक्त केले. कामाची वर्क ऑर्डर (work order) मिळाल्यामुळे आता काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते योजनेच्या कामाचा शुभारंभ केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही शहराचा सर्वागीण विकास (Development) करण्यासाठी पाणी (water) ,वीज (electricity), चांगले रस्ते (road) ,दळणवळणाची साधने, मनुष्यबळ, जमीन आणि राजकीय इच्छाशक्ती ही सात घटक महत्वाचे मानले जाते. विकासासाठी महत्वपूर्ण मानल्या जाणार्‍या या सात वाटाच्या बळावर छोट्या-मोठ्या गावा पासून शहरा पर्यंत अनेकांनी प्रगती करून विकास साधला आहे मात्र नाशिक जिल्ह्यात (nashik district) सर्वात जास्त दळणवळणाची साधने, मनुष्यबळ, मुबलक जमीन, वीज आदी गोष्ठी असताना केवळ भीषण पाणी टंचाईमुळे (Water scarcity) शहर विकास पासून कोसो दूर आहे.

पावसाळा (monsoon), हिवाळा (winter) असो अथवा उन्हाळा (summer) वर्षाच्या बारा महिने नागरिकांना एक हंडा पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र गेल्या 35 ते 40 वर्षा पासून शहरातील आहे. इतर शहरांचा झपाट्याने विकास झालेला असताना मात्र मनमाडचा विकास होण्या ऐवजी हे शहर भकास होण्याच्या उंबरठ्यावर पोहचले आहे.पाणी नाही त्यामुळे औद्योगिक वसाहत,कारखाने,उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारांच्या हाताला काम धंदा नाही.पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक तरुणांना तुटपुंज्या पगारावर बाहेर गावी जावे लागते.

उच्च शिक्षण घेवून देखील नोकरी,कामधंदा मिळत नसल्यामुळे अनेक तरुण नैराश्यपोटी वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी गेले तर काहींनी गुन्हेगारीचा मार्ग देखील अवलंबला आहे पाणी टंचाई सोबत चांगल्या आरोग्या व्यवस्था आणि उच्च शिक्षणाच्या सोयी-सुविधा नाही,वाढत चाललेली गुंडगिरी त्याला मिळणारे राजकीय पाठबळ आदिला कंटाळून हजारो नागरिकांनी या शहराला कायमचा राम-राम ठोकून इतर ठिकाणी स्थलांतरित केले आहे.

सध्याच्या काळात छोट्या खेड्या पासून मोठ्या शहरा पर्यंत सर्वांची लोकसंख्या वाढत चाललेली असताना मात्र कदाचित राज्यात मनमाड हे एकमेव शहर असेल कि ज्याची लोकसंख्या कमी होत चालली आहे त्याला एकमेव कारण होते भीषण पाणी टंचाई आ, सुहास कांदे यांनी मुळावर घाव घालण्याचा निर्धार करत करंजवन योजनेसाठी सतत पाठपुरवा केला अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून योजनेच्या कामाची वर्क ऑर्डर खुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठेकेदाराला देण्यात आली.

यावेळी पालकमंत्री दादाभुसे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे,संग्राम बच्छाव महेंद्र दुकळे,राजाभाऊ भाबड,तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, पंकज निकम,शहर प्रमुख मयूर बोरसे,भाजपा जिल्हाउपाध्यक्ष नितीन पांडे,शहर प्रमुख जयकुमार फुलवानी युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान खान,सुरेश शेलार,ज्ञानेश्वर कांदे,धनंजय कांदे,महावीर ललवाणी,भरत पवार आबा देवरे,नारायण पवार,एकनाथ बोडके,महेश बोराडे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com