मनमाडमधील भव्य कामगार रॅलीने वेधले लक्ष

मनमाडमधील भव्य कामगार रॅलीने वेधले लक्ष

मनमाड | प्रतिनिधी Manmad

शहरातील गवंडी, बांधकाम मजूर आणि कष्टकरी यांनी आज(दि०१) भव्य रॅली काढून कामगार आणि महाराष्ट्र दिन साजरा केला. रॅलीत मोठ्या संख्येने बांधकाम मजूर सहभागी झाले होते....

एकीकडे महाराष्ट्र दिन व कामगार दिन सर्वत्र उत्साहच्या वातावरणात साजरे केले जात असताना दुसरीकडे मात्र कामगारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड शहरात झेंडा वंदना पलीकडे एक ही सांस्कृतिक आणि कामगारांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला नाही.

त्यामुळे या शहरातील सांस्कृतिक आणि कामगार चळवळ लोप तर पावली नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकासह कामगारांना देखील पडला आहे. बिल्डींग बांधकाम मजूर युनियनचे अध्यक्ष हारून भाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली सानप कॉम्प्लेक्स जवळून रैली काढण्यात आली.

कामगार एकजुटीचा विजय असो.हम सब एक ही.कामगार दिन जिंदाबाद,महाराष्ट्र दिन चिरायू हो यासह इतर घोषणा देत ही रैली शहरातील विविध मार्गावरून जावून कामगार संपर्क कार्यालया जवळ त्याची सांगता झाली रेलीत बाळसाहेब चांडे,हेमराज दुग्गड,अक्षय उफाडे,जिभाऊ व्हडगर,प्रवीण कांबळे,कैलाश शिंदे,प्रवीण जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने गवंडी,मजूर आणि कष्टकरी सहभागी झाले होते.

एकीकडे कडक उन्हात बांधकाम मजुरांनी रैली काढून कामगार आणि महाराष्ट्र दिन साजरा केला तर दुसरीकडे मात्र कामगारांचे शहर म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या मनमाड शहरात मोठा असा एक ही कार्यक्रम झाला नाही.

येथे आशिया खंडात क्रमांक दोनचा मानला जाणारा भारतीय अन्न महामंडळचे धान्य साठवणूक करणारे गोडाऊन असून त्यात शेकडो कामगार काम करतात.मध्ये रेल्वेत महत्वपूर्ण मानले जाणारे रेल्वे स्थानक,रेल्वे ब्रिज बांधण्यासाठी लागणारे साहित्य तयार करणारा ऐतिहासिक असा वर्क शॉप,भारत पेट्रोलियम,इंडियन ऑयल,हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे इंधन प्रकल्प,नगरपरिषद,बाजार समिती एलआयसी सह इतर शासकीय निमशासकीय कार्यलयात हजारो कामगार काम करतात.

त्यामुळे या शहराला कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते.सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या कामगार संघटना असून काही वर्षा पूर्वी कामगार दिना निमित्त शहरात या संघटना एकत्रित येऊन सकाळी प्रभात फेरी काढून कामगार मेळावा घेत होते.

एकात्मता चौकात सभेचे आयोजन करून कामगारांना त्यांच्या हक्काची व कर्तव्याची जाणीव करून दिली जात होती मात्र या वर्षी कामगार दिना निमित्त एक ही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नाही.

कदाचीत सर्वच कामगारांना सध्या बक्कळ पगार मिळत असल्यामुळे त्यांना कामगार दिनाचा विसर पडला असावा असे खोचक मत अनेक जुने व सेवानिवृत्त कामगारांनी व्यक्त करून सध्या मनमाड शहरात कामगार चळवळ लोप पावल्याचे चित्र दिसून येत असल्याचे ही या जेष्ठ कामगारांनी सांगितले.

महाराष्ट्र दिन निमित्त नगर पालिका,पोलीस स्थानक आदी सह इतर काही कामगार संघटनानी त्यांच्या कार्यलयात झेंडा वंदना कार्यक्रम केला या व्यतिरिक्त एक ही सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला नाही त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.