मनमाड: आनंद सेवा केंद्राला रक्त संघटक पुरस्कार

मनमाड: आनंद सेवा केंद्राला रक्त संघटक पुरस्कार

उमराणे । वार्ताहर | Umrane

मनमाड (manmad) शहरात सन 2006 पासून 16 वर्ष अविरतपणे रुग्णसेवेचे कार्य करणार्‍या आनंद सेवा केंद्राला (Anand Seva Kendra) नाशिकच्या (nashik) अर्पण रक्तपेढीतर्फे (arpan blood bank) यंदाच्या रक्त संघटक पुरस्काराने (Blood Organizer Award) गौरविण्यात आले. रक्तदान कार्यात (Blood donation work) निस्वार्थीपणे अतुलनीय कार्य करणार्‍या संस्थांना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.

अर्पण रक्तपेढीतर्फे (arpan blood bank) नाशिक (nashik) येथील इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian Medical Association) हॉलमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात अर्पण रक्तपेढीचे प्रमुख नंदकिशोर ताथेड (Nandkishore Tathed, head of Arpan Blood Bank), जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या मुंबई क्षेत्रप्रमुख सुनीता बोरा (Sunita Bora, Mumbai Regional Head, Jain International Trade Organization) यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन रक्त संघटक पुरस्कार प्रदान करण्यात आला. आनंद सेवा केंद्राच्या वतीने अध्यक्ष कल्पेश बेदमुथा, उपाध्यक्ष योगेश भंडारी, दीपक शर्मा, ललित धांदल, विनय सोनवणे, चेतन संकलेचा, नितिन अहिरराव, अमोल देव, संजय गांधी, अनुप पांडे, प्रमोद भाबड यांनी पुरस्कार स्वीकारला.

दरम्यान, आनंद सेवा केंद्राच्या (Anand Seva Kendra) उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल लवकरच उमराणे येथे केंद्राच्या सर्व पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे भारतीय जैन संघटनेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष विनोद पाटणी (Vinod Patni, North Maharashtra Vice President of Indian Jain Association) यांनी सांगितले. आरोग्य व रुग्ण सेवेत आपली वेगळी ओळख निर्माण करणार्‍या आनंद सेवा केंद्राची निवड मनमाड शहराला (manmad city) अभिमानास्पद आहे.

सन 2006 मध्ये आरोग्य सेवेसाठी स्थापन झालेल्या आनंद सेवा केंद्रातर्फे सन 2008 पासून सलग 14 वर्ष भगवान महावीर जयंतीनिमित्त (Mahavira Jayanti) रक्तदान शिबीर (Blood donation camp) आयोजित करण्यात येते. गेल्या 14 वर्षात शिबिराच्या माध्यमातून आनंद सेवा केंद्राने 2 हजारपेक्षा जास्त रक्तपिशव्या संकलित केल्या आहेत. संपूर्ण विश्वावर आलेल्या महाभयंकर कोविडच्या संकट काळात सन 2020 मध्ये 165 व सन 2021 मध्ये 154 तर यंदा 171 रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या. गत 14 वर्षात आनंद सेवा केंद्राच्या माध्यमातून हजारो रुग्णांना तातडीच्या काळात रक्तासंबंधित विशेष मदत करण्यात आली.

आनंद सेवा केंद्राच्या आरोग्य आणि रक्तदान चळवळीत गत 16 वर्षांपासून नियमितपणे सहकार्य करणारे रक्तदातेच या पुरस्काराचे खरे मानकरी आहेत. त्यामुळे हा पुरस्कार त्या निस्वार्थी रक्तदात्यांना समर्पित असून सर्वाच्या सहकार्याने रुग्णसेवेचा हा यज्ञ यापुढेही सुरुच राहील.

- कल्पेश बेदमुथा, अध्यक्ष, आनंद सेवा केंद्र

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com