नाशिक । Nashik

माडसांगवी ता.(15) माडसांगवी ता.नाशिक येथील ग्रामपंचायत सरपंच पदी मनीषा संतोष सोळसे यांची तर उपसरपंचपदी सुनंदा नंदराम पेखळे यांची निवड झाली. यावेळी समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला .

निवडणूक निर्णय अधिकारी आर. डी .शिरोडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीस नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अमोल घाटकर, सुनंदा पेखळे, छाया पेखळे, विशाल बर्वे, कल्पना पेखळे, कल्पना खरात, रेखा घंगाळे, शरद पेखळे, राजेश महाले, लताबाई पेखळे, संदीप गोडसे, मनीषा सोळसे, कोमल घाटकर उपस्थित होते .

येथील ग्रामपंचायत सरपंच पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते. सरपंच पदासाठी मनीषा संतोष सोळसे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच पदी मनीषा सोळसे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले.

उपसरपंचपदासाठी छाया अनिल पेखळे आणि सुनंदा नंदराम पेखळे यांनी अर्ज दाखल केले. उपसरपंच पदाच्या निवडणुकीत छाया पेखळे यांना सहा मते मिळाली. तर सुनंदा पेखळे यांना सात मते मिळाल्याने त्यांची माडसांगवी गावच्या उपसरपंचपदी निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी आर.डी .शिरोडे यांनी घोषित केले. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा समर्थकांनी शाल- श्रीफळ देऊन सत्कार केला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सतत प्रयत्न करू .शासनाच्या विविध योजना गावात राबवुन ग्रामस्थांच्या समस्यांचे निरसन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित सरपंच- उपसरपंच यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.