तळवाडेच्या उपसरपंचपदी आहेर बिनविरोध

तळवाडेच्या उपसरपंचपदी आहेर बिनविरोध

नाशिक | Nashik

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) प्रतिष्ठेची समजली जाणऱ्या तळवाडे ग्रामपंचायतीच्या ( Talwade Gram Panchayat) उपसरपंचपदी शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा वंजारी समाज अध्यक्ष समाधान आहेर यांच्या पत्नी मनीषा आहेर (Manisha Aher) यांची बिनविरोध निवड झाली आहे...

थेट जनतेतून सरपंच निवड झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यवंशी, ग्रामसेवक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच विठाबाई केरू आहेर (Sarpanch Withabai Keru Aher) यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक (Election of Deputy Sarpanch) घेण्यात आली. यावेळी उपसरपंचपदासाठी मनीषा आहेर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यवंशी यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संपत डगळे,हिरामण डगळे,नंदा भिवसेन,रुपाली पवार, सोनम गांगुर्डे हजर होते.

तळवाडे ग्रामपंचायतीवर स्व. तोताराम बोडके यांच्या पॅनलने १९७१ पासून ५० वर्षाची परंपरा कायम राखत सत्ता कायम राखली आहे. उपसरपंचपदी आहेर यांची निवड होताच समर्थकांनी फटाके वाजवत गावातून मिरवणूक कडून जेसिबीवरून गुलालाची उधळण केली.

तसेच नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्यांनी ग्रामस्थांचे आभार मानून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करून शासन स्तरावरील आरोग्य, शैक्षणिक,विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, यावेळी माजी सरपंच नथु बोडके, मोहन बोडके, रोहिदास बोडके, पिंटू बोडके, संतोष बोडके, बबन बोडके, प्रकाश बोडके, शिवाजी बोडके, युवराज बोडके, संजय बोडके, गणपत आहेर, गंगाराम आहेर, पांडुरंग आहेर ,बबन शेंडगे शिवाजी आहेर, निवृत्ती चोथे, लालुमण रामायणे, निवृत्ती शेंडगे, गणेश चोथे, हिरामण बांलमे, धोंडीराम चोथे, विष्णू बोडके, दामू बोडके, तानाजी बालमे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, बाळू गांगुर्डे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com