नांदगाव तालुक्याची तहान भागविणारे माणिकपुंज 'ओव्हरफ्लो'

नांदगाव तालुक्याची तहान भागविणारे माणिकपुंज 'ओव्हरफ्लो'
माणिकपुंज धरण, नांदगाव (संग्रहित फ़ोटो)Digi

नाशिक | Nashik

गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदगाव तालुक्याची (Nandgoan Taluka) तहान भागविणारे माणिकपुंज धरण (Manikpunj Dam) भरले आहे. त्यामुळे मन्याड नदीपात्र देखील ओसंडून वाहू लागले आहे....

दरम्यान अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला नांदगाव तालुक्याला दिलासा मिळाला आहे. माणिकपुंज धरणाच्या लाभक्षेत्रात मन्याड खोऱ्यातील (Manyad River) भागात दमदार पाऊस असल्याने माणिकपुंज भरून वाहू लागल्याने लाभक्षेत्रातील जळगाव बुद्रुक, जळगाव खुर्द, पिंपरखेड आदी भागातील समाधान व्यक्त केले आहे.

जिल्ह्यातील (Nashik District) काही तालुके अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. नांदगाव तालुकाही तहानलेला होता, परंतु तीन चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने शहरासह तालुक्याला दिलासा दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून माणिकपुंज धरण काही दिवसांत ओव्हरफलो होत होते, परंतु अलीकडच्या पर्जन्यमानामुळे तहानलेलेच दिसून येते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com