दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन देणे बंधनकारक

दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन देणे बंधनकारक

नाशिक । प्रतिनिधी

भारतातील सर्व घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिव्यांग व्यक्तींना त्यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र ऑनलाईन देणे अनिवार्य असल्याचा अतिशय चांगला निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला आहे. दिव्यांग बंधू-भगिनींसाठी एक दिलासादायक बातमी आहे, अशी माहिती दिव्यांग संघटनेचे नाशिक विभाग अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी दिली.

या निर्णयाची अंमलबजावणी 1 जूनपासून होणार आहे. यासंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने राजपत्रित अधिसूचना जारी केली आहे. प्रशासनाने युडीआयडी पोर्टलचा वापर करून दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन प्रमाणपत्र वितरित करणे बंधनकारक आहे.

या आदेशाचे राज्यांनी तंतोतंत पालन करावे, असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने अधिसूचनेद्वारे बजावले आहे. सध्या करोना महामारीच्या काळात आपले प्रमाणपत्र दिव्यांगांना मिळवण्यासाठी शासकीय रुग्णालयात जाणे अशक्य असल्याने तसेच आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध नसल्याने प्रत्यक्षात शासकीय कार्यालयात जाणे अशक्य आहे. अशा यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्याची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने दिव्यांगांना ऑनलाईन प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश जारी केले आहेत.

ऑनलाईन प्रमाणपत्रामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणार्‍या अनेक योजना, सेवासुविधांचा लाभ घेता येणार आहे. या निर्णयाचे स्वागत असून दिव्यांग व्यक्तींची गैरसोय कमी होणार आहे.

- बाळासाहेब सोनवणे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com