मंडलिक खून प्रकरण: संशयित रम्मी राजपूत जिल्हा रुग्णालयात दाखल

मंडलिक खून प्रकरण: संशयित रम्मी राजपूत जिल्हा रुग्णालयात दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आनंदवली (Anandavali) शिवारातील मंडलिक खून (murder) प्रकरणातील जामिनावर असलेला संशयित रम्मी राजपूत (Rummy Rajput) याचा

जिल्हा व सत्र न्यायालयाने (District and Sessions Court) अंतरिम जामीन (Bail) रद्द करताच गंगापूर पोलिसांनी (Gangapur Police) त्याला ताब्यात घेत वैद्यकीय चाचणीसाठी (Medical test) जिल्हा रुग्णालयात (District Hospital) नेले असता त्याचा रक्तदाब वाढल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आनंदवली येथील रमेश मंडलिक या वृद्धाच्या खून प्रकरणात रम्मी राजपूत सह तब्बल २० संशयितांचा समावेश असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने तत्कालीन आयुक्त दिपक पांडे (Former Commissioner Deepak Pandey) यांनी संघटित गुन्हेगारी अंतर्गत मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. दरम्यान याप्रकरणात राजपूतसह, बांधकाम व्यावसायीक कोल्हे यांनी मोक्काच्या विरोधात याचिका दाखल केली होती.

न्यायालयाने याचिका फेटाळली होती. राजपूत कारागृहात असताना जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज (Bail application) दाखल केला होता. न्यायालयाने राजपूतला अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र गुरुवारी (दि. १०) अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी झाली असता न्यायालयाने अर्ज फेटाळला. त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्याचे वपोनी रियाज शेख यांनी राजपूत यास ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृहात नेण्यापूर्वी वैद्यकीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com