‘मन की बात’ युवाशक्तीसाठी प्रोत्साहन देणारा: डॉ. पवार

‘मन की बात’ युवाशक्तीसाठी प्रोत्साहन देणारा: डॉ. पवार

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी भारत (India) महासत्ता (superpower) बनवण्याचे स्वप्न पाहिले आहे.

भारतातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग महासत्ता बनवण्यात असावा यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे व ‘मन की बात’ (Man Ki Baat) युवाशक्तीसाठी (youth power) प्रोत्साहन देणारा कार्यक्रम आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी केले.

दिंडोरी (dindori) येथे ‘मन की बात’ या कार्यक्रमास डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संपर्क साधला. अध्यक्षस्थानी जिल्हा संघटन मंत्री सुनील बच्छाव (District Union Minister Sunil Bachhav) होते. ना. डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी भारतातील प्रत्येक वेगळ्या कार्याची दखल घेत आहे. त्याचा उल्लेख भाषणात करत आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघातील (Dindori Lok Sabha Constituency) नागरिकानी वेगवेगळ्या उल्लेखनीय कामातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करावा.

डिजिटल (digital) माध्यमे वापरून उद्योग व्यवसाय करावा असे आवाहन डॉ. भारती पवार यांनी केले. यावेळी सुनील बच्छाव यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे महत्व सांगून भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात सर्वांनी योगदान द्यावे. ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) मोहीम नाशिक जिल्ह्यात (nashik district) यशस्वी झाली आहे त्याचप्रमाणे पुढील राष्ट्रीय कार्यक्रम सुद्धा यशस्वी करावे असे आवाहन प्रा. बच्छाव यांनी केले.

शिवशाहीर गोसावी, ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे, भाजप तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत अमर राजे यांनी केले. सूत्रसंचालन तुषार वाघमारे यांनी केले. आभार शाम मुरुकुटे यांनी मानले. यावेळी दिंडोरी शहराच्या वतीने गटनेत्या अरुणा देशमुख, नगरसेवक नितीन गांगुर्डे, प्रज्ञा वाघमारे, आशा कराटे यांनी डॉ. भारती पवार यांचा सत्कार केला.

तहसीलदार पंकज पवार, गटविकास अधिकारी शेवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, पोलिस उपनिरीक्षक कावळे यांचा अमृत महोत्सव उल्लेखनीय काम केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शामराव मुरकूटे, सचिन दराडे, श्याम बोडके, योगेश बर्डे, योगेश तिडके, दिलीप जाधव, प्रमोद देशमुख, काका देशमुख,

अंकुश मोरे, प्रभाकर वडजे, रणजित देशमुख, विलास देशमुख, गणेश कदम, धीरज गोसावी, अमरसिंह राजे, निलेश गायकवाड, राम कराटे, कैलास धात्रक, धीरज चव्हाण, भास्करराव कराटे, तुषार घोरपडे, बाबुशेठ मणियार,अमोल खोडे, गणेश चव्हाण, नित्यानंद जाधव, बाळु सोनवणे, सोमनाथ बस्ते, भास्कर गवळी, सोनवणे, नरेश चव्हाण, राकेश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com