मामको बँकेचा उत्कर्ष सहकार क्षेत्रास प्रेरणादायी : भुसे

सटाणा रोड नूतन शाखेचे लोकार्पण
मामको बँकेचा उत्कर्ष सहकार क्षेत्रास प्रेरणादायी : भुसे

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

सहा दशकांच्या वाटचालीत पारदर्शी व एकमताच्या कारभाराद्वारे सभासदांचा विश्वास संचालक व अधिकारी वर्गाने संपादन केल्यामुळेच मामको बॅँक आर्थिक प्रगतीच्या शिखरावर पोहचू शकली आहे. लहान मोठे व्यापारी असो की किरकोळ विक्रेते त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी दिल्या जात असलेल्या आर्थिक पाठबळामुळे मामको खºया अर्थाने तालुक्याची अर्थवाहिनी ठरली आहे. सहकार क्षेत्र अडचणीत असताना मामको बॅँकेने साधलेला उत्कर्ष निश्चितच प्रेरणादायी दिपस्तंभ ठरावा असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी येथे बोलताना केले...

मालेगाव मर्चंट को-ऑप बॅँकेच्या सटाणा रोड शाखेचे अत्याधुनिक व वातानुकुलीत स्व मालकीच्या जागेत आज स्थलांतर संपन्न झाले या नूतन शाखेचे उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

जिल्हा बॅँक माजी चेअरमन सुरेश निकम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जनता बॅँक व्हा. चेअरमन हाफिज अन्सारी, भाग्यलक्ष्मी पतसंस्था चेअरमन रविंद्र निकम, मामको चेअरमन राजेंद्र भोसले, व्हा. चेअरमन गौतम शाह, शरद दुसाने, नरेंद्र सोनवणे, सतीश कासलीवाल, चंदूबापू बच्छाव, भिका कोतकर, नंदू तात्या सोयगावकर, संजय दुसाने आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मामको बँकेचा उत्कर्ष सहकार क्षेत्रास प्रेरणादायी : भुसे
IMD : नाशिक, अहमदनगरसह 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा

सहकार क्षेत्रात काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. संस्थाहितासाठी कटू निर्णय देखील घ्यावे लागतात. परंतु हे केले न केल्यास बॅँक लयास जाते याचा अनुभव जिल्हा बॅँकेच्या झालेल्या दुरावस्थेवरून आपण सर्व जण घेत असल्याचे सांगत पालकमंत्री भुसे पुढे म्हणाले, जिल्हा बॅँकेचा परवाना रद्द का करू नये अशी नोयीस रिझर्व्ह बॅँक नाबार्डने बजावली आहे. हे निश्चित दुर्दैवी आहे.

लहान कर्जदार कर्ज भरतात अनेक मोठी माणसे कर्ज घेतात पण भरत नाही. त्यामुळे जिल्हा बॅँक अडचणीत आली आहे. कर्जवसुलीसाठी लहान कर्जदाराची जमीन जप्त होते. मात्र, कोट्यवधीची थकबाकी असणाºयांवर कारवाई केली जात नाही. किंबहुना त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळेच जिल्हा बॅँक आर्थिक अडचणीत सापडली आहे.

बॅँकीग क्षेत्रात विश्वास महत्वाचा आहे. तो टिकविण्याचे काम मामको बॅँकेने खºया अर्थाने केले असल्यानेच बॅँक प्रगतीकडे झेपावत आहे. शाखा विस्तारात मामकोची शाखा नाशिक शहरात देखील सुरू करावी यासाठी शासन स्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य आपण करू असे आश्वासन भुसे यांनी शेवटी बोलतांना दिले.

जिल्हा बॅँक माजी चेअरमन सुरेश निकम यांनी मार्गदर्शन करताना मामको बॅँकेच्या आश्वासक वाटचालीचे कौतूक केले. ६० वर्षात बॅँकेने साधलेली प्रगती शहराच्या अर्थकारणाला चालना देणारी ठरली आहे. आपली बॅँक आपली माणसं हे ब्रिद आपल्या कारभाराद्वारे मामको बॅँक संचालक व अधिकाºयांनी सार्थ करून दाखविले असल्याचे निकम यांनी सांगितले.

भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीचे आचरण करीत गरीब - श्रीमंत दरी कमी करण्यासाठी सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम मामको बॅँकेतर्फे केले जात असल्याची माहिती चेअरमन राजेंद्र भोसले यांनी प्रास्ताविक करताना दिली. एटीएम, पॉज मशिन, डिजिटल व्यवहार आदी अत्याधुनिक सुविधा देत असताना शाखा देखील अत्याधुनिक व्हाव्यात या दृष्टीकोनातून सुशोभिकरण करण्याचा निर्णय बॅँकेने घेतला आहे.

सभासद, ठेवीदार व ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न यामागे आहे. लवकरच कॅम्प व वधॅमान नगर या शाखादेखील स्व मालकीच्या जागेत उभारल्या जाणार आहेत. मामकोच्या आठ पैकी चार शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यरत होत आहे. औद्योगिक वसाहतीसह चाळीसगावफाटा लगत मोठ्या प्रमाणात व्यापार उद्योग वाढत आहे. त्यामुळे लोणवाडे शिवारात मामकोची शाखा लवकरच उघडली जाणार असल्याची माहिती भोसले यांनी यावेळी बोलतांना दिली.

मामको बँकेचा उत्कर्ष सहकार क्षेत्रास प्रेरणादायी : भुसे
मोठी बातमी! शरद पवारच राष्ट्रवादीचे 'गॉडफादर'; राजीनाम्याचा निर्णय मागे

शहर असो की राज्य संकट काळात मामको बॅँकेने आपली सामाजिक बांधिलकी जपत आपद्ग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील छोटा माणूस मोठा व्हावा याचा प्रयत्न मामकोने केला आहे. त्यामुळेच बॅँक सभासद ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरली आहे.

शुन्य टक्के एनपीए कडे संचालक मंडळांने वाटचाल सुरू केली आहे. कर्जाबरोबर ठेवीच्या सुरक्षितेसह देखील प्राधान्य देण्यात आले आहे. मामको बॅँकेची प्रगती सभासद, ठेवीदार, व्यापारी, उद्योजकांच्या असलेल्या सहकार्यामुळेच होत असल्याचे भोसले यांनी शेवटी बोलताना सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मामको बँकेचा उत्कर्ष सहकार क्षेत्रास प्रेरणादायी : भुसे
Video : त्र्यंबकला अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नूतन शाखेच्या सुशोभिकरणासाठी सहाय्य करणाºया शाम मिठभाकरे, अजय शाह, भालचंद्र आघारकर, नागेश पिंगळे, मंगला भावसार आदींचा सत्कार संचालकांतर्फे केला गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश कलंत्री यांनी तर आभार गौतम शाह यांनी मानले.

कार्यक्रमास शरद पाटील, अजयकांत मंडावेवाला, विठ्ठल बागूल, छगन बागूल, मनिषा देवरे, उदय राहुडे, रविंद्र ओस्तवाल, नरेंद्र सोनवणे, बालचंद छाजेड, नितीन पोफळे, अशोक गुप्ता, दादा जाधव, यु.आर. पाटील, मुकूंद दिक्षीत, चंद्रकांत शिरापुरे, राजेंद्र पवार, पितांबर मोरे, मनिष पटनी, देविदास बागडे, जनरल मॅनेजर कैलास जगताप, विलास होनराव, हिंदी गवांदे आदींसह मोठ्या संख्येने सभासद, नागरीक उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com