मामको बँकेची निवडणूक बिनविरोध

मामको बँकेची निवडणूक बिनविरोध

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या मालेगाव मर्चंन्टस को, आँप बँकेची निवडणूक (Election of Malegaon Merchants Co,op Bank )चेअरमन राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल ची घोषणा होताच इतर इच्छुक उमेदवारांनी माघार घेतल्याने बिनविरोध झाली आहे.

बँक आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावी यास्तव संचालक मंडळातर्फे पारदर्शी व एकमताने सुरू असलेल्या कारभारावर येथील सर्वपक्षीय नेत्यांसह, व्यापारी, उद्योजक तसेच सभासदांनी शिक्कामोर्तब करत निवडणूक बिनविरोध करून सहकार चळवळीत कार्यरत कार्यकर्त्यांना आगळावेगळा संदेश दिला असल्याचे प्रतिपादन सहकार पॅनलचे नेते चेअरमन राजेंद्र भोसले यांनी येथे बोलताना केले

मामको बँकेच्या 21 जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मागास प्रवर्गातून अशोक मामा बैरागी तर अनुसूचित जाती जमाती गटातून छगन बागुल यांचेच अर्ज दाखल झाल्याने ते बिनविरोध निवडून आले होते .महिला गटातून मंगला भावसार यांनी माघार घेतल्याने मनीषा देवरे व डॉ.अलका भावसार यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. हे चारही उमेदवार सत्तारूढ सहकार पॅनल गटातील होते.

गुरुवारी माघारीच्या दिवशी चेअरमन राजेंद्र भोसले यांनी सहकार पॅनेलच्या उमेदवारांची नावाची घोषणा करताच पॅनलमध्ये वर्नि लागलेल्या इच्छुक उमेदवारांनी काहीश: नाराजीने का होईना आपले माघारीचे अर्ज दाखल केल्याने बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला होता माघारी नंतर मामको बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी सर्वसाधारण गटात राजेंद्र लक्ष्मण भोसले, रवींद्र बाबूलाल दशपुते ,अशोक लक्ष्मण दास बैरागी, सतीश रामकिसन कलंत्री,

शरद नामदेव दुसाने, सतीश कवरीलाल कासलीवाल, भिका पांडुरंग कोतकर, संजय दत्तात्रय दुसाने, भास्कर चिला पाटील, गौतम रमेशचंद्र शहा, नरेंद्र जगन्नाथ सोनवणे, सुरेश विश्वास सोयगावकर, अजयकांत मनोहर मंडावेवाला ,कीर्ती कुमार हरिलालअसमर,शरद रामदास पाटील, रवींद्र प्रकाशओसतवाल हे तर महिला गटातून मनीषा यशवंत देवरे,डॉ. अलका दिलीप भावसार, इतर मागास प्रवर्गातून विठ्ठल रघुनाथ बागुल विशेष मागास गटातून अशोक लक्ष्मण दास बैरागी, तर अनुसूचित जाती जमाती गटातून छगन शंकर बागुल या उमेदवारांचे नामांकन अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली असून त्याची रीतसर घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे केली जाणार आहे.

नावलौकिकत भर घालू - भोसले

मामको बँकेच्या साठ वर्षाच्या वाटचालीत प्रथमच निवडणूक बिनविरोध पार पडली. सहकार क्षेत्राची व्याप्ती वाढावी तो अधिक मजबूत व्हावा, या दृष्टिकोनातून तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, व्यापारी -उद्योजक व सभासदांनी, बिनविरोध निवडणूक करत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे .निवडणूक बिनविरोध झाली तरी या भ्रमात न राहता, अधिक जबाबदारीने संचालक मंडळ येणाऱ्या काळात मामको बँकेचा नाव लोकिकात भर पडेल असेच कार्य करेल, अशी ग्वाही चेअरमन राजेंद्र भोसले यांनी दिली.

सहकार पॅनल बिनविरोध झाल्यावर आज येथील मराठा दरबार सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत वार्तालाप करताना चेअरमन भोसले बोलत होते. पारदर्शी व एकमताने सुरू असलेल्या संचालक मंडळाच्या कारभारामुळे सहकार क्षेत्र अडचणीत असताना देखील, मामकोने प्रगतीचे टप्पे गाठले आहे. शहरातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक उन्नतीत भर पडावी व तो स्वबळावर उभा राहावा, यासाठी संचालक मंडळ काम करीत आहे. ही जनमानसात असलेली विश्वासहारता व लोकभावना लक्षात घेऊन पालकमंत्री दादाजी भुसे, आ मौलाना मुफ्ती , माजी आ,शेख रशीद ,असिफ शेख ,युवक नेते अद्वय हिरे,ज्येष्ठ नेते सुरेश निकम, प्रसाद हिरे, सुनील गायकवाड, शाने हिंद निहाल अहमद ,आदी सर्वपक्षीय नेत्यांनी दुसऱ्या पॅनल निर्मितीसाठी पुढाकार किंवा प्रोत्साहित केले नाही.तसेच व्यापारी, उद्योजक संघटना, सभासदांनी देखील बिनविरोधाचा आग्रह धरून यासाठी विशेष प्रयत्न केले.

विशेष म्हणजे पॅनल मध्ये नाव समाविष्ट न झाल्याने इच्छुकांनी देखील माघार घ्यावी. यासाठी महेश पाटोदिया ,प्रदीप बच्छाव, निखिल पवार. ओम गगराणी यांचे प्रयत्नांना यश येऊन सर्व इच्छुकांनी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकल्याबद्दल चेअरमन भोसले यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

64 हजार कोटीपर्यंत मामकोची पोचलेली उलाढाल एक लाख कोटीपर्यंत नेण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करत भोसले पुढे म्हणाले, इतरत्र बँकांमध्ये ठेवी कमी होताना दिसत असल्या तरी मामकोत दरवर्षी वाढ होत आहे व होत राहील.व्यापारी वर्गासाठी लॉकर सुविधा तसेच आधुनिक पद्धतीने दोन नवीन बँक शाखा सुरू करनार असल्याची माहिती भोसले यांनी शेवटी बोलताना दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com