मामको बँक निवडणूक कार्यक्रम जाहीर

5 मतदान; 14 ते 27 ऑक्टोबरपर्यंत माघारीची मुदत
मामको बँक निवडणूक कार्यक्रम जाहीर

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

तालुक्याची असलेल्या येथील मालेगाव मर्चन्टस् को. ऑप. बँकेच्या (Malegaon Merchants Co. Op. Bank) पंचवार्षिक निवडणुकीचा (election) स्थगित कार्यक्रम सहकारी संस्था उपनिबंधकांतर्फे पुन्हा घोषित करण्यात आला आहे.

या निवडणुकीसाठी (election) येत्या 5 नोव्हेंबर रोजी मतदान (voting) घेतले जाणार असून 14 ते 27 ऑक्टोंबरपर्यंत नामांकन माघारीची मुदत देण्यात आली आहे. मामको बँक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर (Election program announced) झाल्याने सत्तारूढ गटाच्या पॅनलमध्ये वर्णी यासाठी इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. गतवर्षीच मामको बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आली होती. मात्र करोना (corona) उद्रेकामुळे निवडणूक घेण्यात आली नव्हती.

शासनातर्फे निर्बंध हटविण्यात आल्यानंतर 9 ऑगस्टरोजी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. मात्र चार महिन्यापुर्वी अतीवृष्टीचे (heavy rain) कारण देत राज्य शासनातर्फे (state government) सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होवून माघारीची प्रक्रिया सुरू झाली असतांनाच शासनातर्फे निवडणूक (election) प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.

त्यामुळे निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांचा मोठा हिरमोड झाला होता. शासनाच्या या निर्णयाविरोधात मामको बँक चेअरमन राजेंद्र भोसले (MAMCO Bank Chairman Rajendra Bhosale) यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेत याचिका देखील दाखल केली होती. मात्र चार महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा प्रक्रिया प्रारंभ झाल्याने इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

मामको बँकेच्या 21 जागांसाठी 49 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वसाधारण गटाच्या 16 जागांसाठी 34 नामांकन अर्ज तर महिला राखीव गटाच्या 2 जागांसाठी 3 अर्ज, इतर मागास गटाच्या 1 जागेसाठी 10 अर्ज, तसेच अनुसूचित जाती-जमाती व भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रत्येकी 1 जागेसाठी एक-एक अर्ज दाखल करण्यात आले होते. भटक्या विमुक्त जाती-जमाती या प्रवर्गातून ज्येष्ठ संचालक अशोकमामा बैरागी तर अनुसूचित जाती-जमाती गटातून विद्यमान संचालक छगन बागुल या दोघांचेच अर्ज दाखल झाले होते व ते छाननी प्रक्रियेत वैध देखील ठरले होते. यामुळे या दोघांची बिनविरोध निवड अटळ ठरली आहे.

मामको 22 हजाराहून अधिक सभासद असून स्थगित निवडणूक कार्यक्रम पुन्हा घोषीत झाल्याने सभासदांसह इच्छुक उमेदवारांची उत्सुकता वाढली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने पॅनल निर्मितीच्या प्रक्रियेस पुन्हा वेग आला आहे. गत पंचवार्षिकमध्ये विरोधात असलेल्या ज्येष्ठ संचालक रविंद्र दशपुते, अशोकमामा बैरागी यांच्याशी राजेंद्र भोसले यांच्याशी पुन्हा मनोमिलन झाले आहे.

त्यामुळे चेअरमन राजेंद्र यांच्या पॅनलमध्ये वर्णी लागावी यासाठी इच्छुकांतर्फे मोर्चेबांधणीस प्रारंभ झाला असून भोसले यांच्या पॅनलमध्ये कुणाची वर्णी लागते व या निवडणुकीत कुणाला ब्रेक दिला जातो याकडे सभासदांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. माघारीच्या दोन दिवस अगोदर सत्तारूढ गटातर्फे पॅनलची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com