मॉल्स, व्यापारी संकुले खुले
नाशिक

मॉल्स, व्यापारी संकुले खुले

सुरक्षिततेच्या सशर्त अटींवर झाले सुरू

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन संपल्यानंतर आता अनलॉक -03 ची प्रक्रिया देशभरात सुरू झाली आहे. राज्य शासनाने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्यवसाय सुरू करण्यास प्रारंभ करीत मिशन बिगेनअगेन सुरू केले आहे. लिकर, सलून यांना परवानगी दिल्यानंतर आता राज्यातील मॉल व व्यापारी संकुले सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. यानुसार नाशिक शहरातील मॉल व व्यापारी संकुले काल (दि.5)पासुन सुरु झाली आहे. या निर्णयामुळे आता व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी देशभरात 22 मार्च रोजी देशभरात जनता कर्फ्यु आणि नंतर 23 मार्चपासुन थेट 31 मे पर्यत लॉकडाऊन जारी करण्यात आल्यानंतर दळणवळणासह सर्वच व्यावसाय बंद करण्यात आले होते. नागरिकांनी घरीच सुरक्षित राहण्यास सांगण्यात येऊन केवळ जीवनावश्यक वस्तु घेण्यासाठी बाहेर पडता येत होते.

नंतर 2 जुनपासुन लॉकडाऊन टप्प्या टप्प्याने शिथील करण्यात आले होते. यात लिकर व सलुन व नंतर जीम - व्यायाम शाळा यांना जुलै महिन्यात सुट देण्यात आल्यानंतर आता ऑगस्ट मध्ये शासनाने सामाजिक अंतराचे पालनासह मास्क वापर व सॅनेटाईजेशन करणे आदीचे पालन करण्याचे बंधन घालत आजपासुन मॉल व व्यापारी संकुल सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे आजपासुन सर्वत्र मॉल - व्यापारी संकुल सुरु झाले आहे. नाशिक शहरातील चार महिन्यापासुन बंद असलेले लहान मोठे असे 14 - 15 मॉल व 300 व्यापारी संकुले आता सुरक्षिततेच्या सशर्त अटींवर सुरू झाले आहे.

लक्ष ठेवण्यासाठी मनपाची पथके...

नाशिक शहरातील मॉल व व्यापारी संकुले आजपासुन सुरु झाली असली तरी त्यांना शासनाने घालतेल्या सुरक्षिततेच्या अटींचे व्यवस्थापनाकडुन पालन केले जाते किंवा नाही, हे तपासणीसाठी महापालिकेच्या विभागीय अधिकार्‍यांनी विभागीय पथकांची नियुक्त केली आहे. ही पथके अचानक याठिकाणी भेटी देणार असुन त्यावेळी सुरक्षिततेच्या गोष्टींचे पालन केले जाते का ? हे पाहणार आहे. अटी न पाळणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com