मालेगावनामा : बंडुकाकांचे ‘सस्पेन्स’ तालुक्यात उत्सुकता वाढविणारे

मालेगावनामा : बंडुकाकांचे ‘सस्पेन्स’ तालुक्यात उत्सुकता वाढविणारे

मालेगाव । हेमंत शुक्ला | Malegaon

80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण (Politics) करा या शिवसेना (shiv sena) प्रमुखांनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे तालुक्यात बारा बलुतेदार मित्रमंडळाच्या माध्यमातून समाजकारणात सक्रिय असलेल्या बंडुकाका बच्छाव (bandukaka bachhav) यांना पक्षात येण्याचे आमंत्रण भाजप (bjp) नेते अव्दय हिरे (Avday Hirey) व सुनिल गायकवाड (sunil gaikwad) या नेत्यांनी नुकतेच दिले.

मनपासह बाजार समिती (Market Committee), जिल्हा परिषद (Zilla Parishad), पंचायत समिती (panchayat samiti) आदी निवडणुकांचा (election) फड रंगण्यापुर्वीच हे आमंत्रण दिले गेल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण (Political atmosphere) अपेक्षेप्रमाणे ढवळून निघाले आहे. मात्र सध्या कुठल्याही पक्षात सक्रिय नाही. भविष्यात वेळ आल्यास या प्रथम निमंत्रणाचा निश्चित विचार होईल, असे आश्वासन बच्छाव यांनी हिरे-गायकवाड यांना देत बच्छाव यांनी स्वत:च्या भुमिकेचा ‘सस्पेन्स’ (suspense) कायम ठेवल्याने त्यांच्या आगामी वाटचालीबाबत तालुक्यात उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

राजकारणात कुणी कुणाचा दिर्घकाळ शत्रू अथवा मित्र राहत नाही. सत्तेसाठी परस्पर विरोधी विचारधारा असलेले पक्ष जेव्हा एकत्र येतात किंवा नेत्यांच्या पक्ष बदलाच्या घटनांनी दिसून आले आहे. विधानसभा-लोकसभा (Vidhan Sabha-Lok Sabha election) निवडणुकीस अजून खूप अवधी असल्याने आत्तापासून विरोधक वाढवायचे नाही व सत्ता केंद्राकडून समर्थक तसेच कार्यकर्त्यांच्या अडचणी वाढविणे योग्य नाही.

तसेच राजकारणात केव्हा काय घडेल याचा अंदाज येणे अवघड आहे. राज्यात सत्तेसाठी काँग्रेस (Congress) - राष्ट्रवादी (Nationalist Congress) व शिवसेना (shiv sena) या तिघा पक्षांनी एकत्र येत जन्मास घातलेल्या महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) प्रयोग राजकारणातील अनिश्चितेची प्रचिती देणारा ठरला आहे. त्यामुळे भाजपात प्रवेश करायचा व उद्या हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावर पुन्हा भाजप-सेना युती झाल्यास आपण कुणाकडे पहायचे? त्यामुळे ‘अती घाई-संकटात नेई’ या धोरणानुसार बंडुकाका बच्छाव यांनी सावध पवित्रा घेतल्याची चर्चा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

निवडणुकीचे पडघम वाजू लागले की पक्ष अदला-बदलासह विकासकामांची मांदियाळी सुरू होते. पक्ष निष्ठावंत म्हणून साडेचार वर्षे मिरवणारे अचानक साक्षात्कार झाल्याप्रमाणे दुसर्‍या पक्षात केव्हा प्रवेश करते होतात हे कुणालाच समजत नाही. विकासकामांची गती देखील अखेरच्या सहा-सात महिन्यात अशी वाढते की प्रभाग अथवा शहर ‘स्मार्ट’ झाले म्हणून समजावे. पक्षीय अदला-बदलाचे राजकीय वर्तुळातील वारे असो की अचानक विकासाचे पर्व अवतरू लागले की निवडणुका जवळ आल्याचे जनतेच्या आता लक्षात येवू लागले आहे.

शहर-तालुक्यात देखील गत काही महिन्यांपासून राजकीय वातावरण आगामी महानगरपालिका (Municipal Corporation), जिल्हा परिषद (Zilla Parishad), पंचायत समिती (panchyat samiti), बाजार समिती (Market Committee) आदी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेते-लोकप्रतिनिधींचे वेगवेगळे उपक्रम-कार्यक्रम व गाठीभेटींनी ढवळून निघण्यास प्रारंभ झाला आहे. करोना उद्रेक काळात जाहीर कार्यक्रमांना बंदी असली तरी प्रतिकार शक्ती वाढविणार्‍या ऑर्सेनिक अल्बम (Arsenic album) या गोळ्यांचे वाटप असो की भाजीपाला (Vegetables), किराणा, वैद्यकिय मदतीच्या माध्यमातून जनसेवेला खंड देण्यात आला नव्हता.

करोनाचा (corona) उद्रेक नियंत्रणात आल्याने गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधी-राजकीय नेत्यांतर्फे विकासकामांना वेग दिला गेला. दसरा-दिवाळीनिमित्त राबविण्यात आलेले आगळेवेगळे उपक्रम व वाढता जनसंपर्क निवडणुका जवळ आल्याची चाहूल देणारे ठरले होते. सत्तेसाठी झालेल्या महाआघाडीच्या प्रयोगाने सावध झालेल्या भाजपने पक्ष संघटन मजबूत करण्यास प्रारंभ केला आहे.

त्यामुळेच पक्षात सक्रिय नसलेल्या युवकनेते अव्दय हिरे यांना पुन्हा सक्रिय करण्याबरोबरच त्यांचे व भाजप गटनेते सुनिल गायकवाड यांच्यातील मतभेद संकट मोचक ठरलेल्या आ. गिरीश महाजन (mla girish mahajan) व आ. जयकुमार रावल (mla Jayakumar Rawal) यांनी एका बैठकीत संपुष्टात आणले. हा निर्णय घेतांना तालुक्यातील निवडणुकांची मदार हिरेंच्या खांद्यावर टाकली गेली. पक्षात सक्रिय झालेल्या हिरे यांनी पक्षाच्या धोरणानुसारच आगामी काळात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Self Government Institutions) निवडणुकीत भाजपला निर्विवाद यश मिळावे या दृष्टीकोनातून पाऊले टाकण्यास प्रारंभ केली आहे.

यातूनच शिवसेनेचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या विजयांमध्ये सिंहाचा वाटा उचलणारे तसेच कसमादे भागात आपल्या सामाजिक उपक्रमाव्दारे लोकप्रिय बनलेले कृउबा माजी सभापती बंडुकाका बच्छाव हे गेल्या काही वर्षापासून शिवसेनेपासून पर्यायाने ना. भुसे यांच्यापासून दूर गेल्याचे चित्र असल्याने अव्दय हिरे व सुनिल गायकवाड या दोघांनी बंडुकाकांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत थेट भाजपात प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले. घरी आलेल्या दोघा आबांचा बच्छाव यांनी देखील यथोचित सत्कार केला.

तुर्त आपण कोणत्याच पक्षात नसून जेव्हा केव्हा पक्षात सक्रिय होण्याची वेळ येईल तेव्हा प्रथम निमंत्रण दिलेल्या भाजपाचा निश्चित विचार करू, असे आश्वासन बच्छाव यांनी यावेळी हिरेंना दिले. स्वत:ची ताकद असलेल्या नेत्यांना पक्षात घेत सक्रिय करण्यामागे काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळावे व तालुक्यात निर्विवाद वर्चस्व ठेवून असलेल्या कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्याच्या दृष्टीकोनातून भाजपतर्फे ही रणनिती अवलंबविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

तालुक्यातच नव्हे तर कसमादे भागात बंडुकाका बच्छाव आपले प्रभुत्व व लोकप्रियता टिकवून आहे. समाजकारण असो की राजकारण या दोन्ही क्षेत्रात कृषिमंत्री भुसे व बच्छाव यांनी एकत्र वाटचाल केली आहे. भुसे यांना शिवसेनेचे तालुकाप्रमुख पद मिळाल्याने जाणता राजा मंडळातील कार्य थांबवत बच्छाव भुसेंच्या मदतीसाठी सेनेत सक्रिय झाले होते.

भुसे-बच्छाव यांनी एकत्रितरित्या निर्माण केलेल्या झंझावातामुळेच शिवसेनेचा तालुका बालेकिल्ला ठरला हे नाकारणे धाडसाचे ठरेल. भुसे यांची विधानसभा निवडणूक असो की इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रचाराची धुरा बच्छाव यांनी सांभाळली आहे. मात्र स्वाभिमान दुखावला गेल्याने बच्छाव सेनेपासून उघड नसले तरी दुरावले गेल्याचे चित्र गत काही वर्षात दिसून आले आहे. त्यामुळे बारा बलुतेदार मंडळातर्फे आपले स्वतंत्र अस्तित्व बच्छाव यांनी दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

बारा बलुतेदाराच्या माध्यमातून आपले वेगळे साम्राज्य निर्माण करतांना भुसे विरोधात अथवा इतर पक्षांशी जवळकी अशी कोणतीच भुमिका बच्छाव यांनी घेतलेली नाही. हे त्यांच्या परिपक्व राजकारणाचेच द्योतक मानले जात आहे. धनशक्ती विरूध्द जनशक्तीच्या नारा देत झालेल्या लढाईत जनशक्तीचा विजय झाल्याचे तालुक्याने पाहिले आहे. हे लक्षात ठेवत बच्छाव यांनी विविध सामाजिक उपक्रमे राबविण्याचा धडाका सुरू ठेवला आहे. करोना उद्रेक काळात प्रतिकार शक्ती वाढविणार्‍या आर्सेनिक अल्बम औषधे असो की भाजीपाला, किराणा साहित्य वाटप ते गोरगरीबांना करत राहिले.

करोना बाधितांना स्वत:चा जीव धोक्यात घालून धीर देण्याचे व आर्थिक मदत करण्याचे काम त्यांनी केले. करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा अंत्यसंस्कार करावयास कुणी पुढे धजावत नसतांना त्यांनी स्वत: पुढाकार घेत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. तालुक्यात पाणीटंचाई (Water scarcity) उद्भवल्याने पाच टँकरव्दारे पाणी पुरवठा केला. रूग्ण वाहिका, शव वाहिका व शवपेट्या उपलब्ध करून दिल्या. गोरगरीब मुला-मुलींचे लग्न लावून दिले व अग्नी तांडवात सर्वस्व जळालेल्यांचे घरे उभारून दिली. अशी अगणित कामे बच्छाव यांनी केली व करत आहेत.

या समाजकारणामुळेच तालुक्यात त्यांनी स्वत:ची आगळीवेगळी ओळख निर्माण करत आपला दबदबा कायम ठेवला आहे. हे लक्षात घेवूनच बच्छाव यांना पक्ष प्रवेशासाठी भाजप नेत्यांतर्फे निमंत्रण दिले गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात केव्हा काय घडेल याचे भाकित वर्तविणे कठीण आहे. त्यामुळे ‘इतक्या’ लवकर निर्णय घेण्याची घाई नको म्हणूनच बंडुकाका यांनी सावध पवित्रा घेतल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मात्र या पावित्र्यामुळे बंडुकाकांची आगामी राजकीय वाटचाल कशी राहिल याबाबत तालुक्यात उत्सुकता कायम आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com