मालेगावनामा: पारदर्शी कारभाराने घडविला इतिहास

मालेगावनामा: पारदर्शी कारभाराने घडविला इतिहास

मालेगाव | हेमंत शुक्ला | Malegaon

मालेगाव तालुक्याची (malegaon taluka) अर्थवाहिनी ठरलेल्या येथील मालेगाव मर्चंन्टस् को. ऑप. बँकेची (Malegaon Merchants Co. Op. Bank) पंचवार्षिक निवडणूक (election) अखेर अपेक्षेप्रमाणे बिनविरोध (Unopposed) झाली आहे

निवडणूक निर्णय याबाबत घोषणा करत शिक्कामोर्तब करतील इतकेच सोपस्कार बाकी राहिले आहे विधानसभेसारख्या आरोप प्रत्यारोपांनी चुरसपूर्ण वातावरणात मामकोच्या निवडणुका यापूर्वी गाजल्या आहेत. मात्र, संस्था असो की शहराच्या प्रगतीसाठी जनतेसह सर्वपक्षीय नेते (All-party leader) पदाधिकार्‍यांनी एकजूट दाखविल्यास त्याची फलनिष्पत्ती निश्चित चांगली होते हे मामको बँकेच्या बिनविरोध निवडणुकीने दाखवून दिले आह.

मामको बँकेच्या (MAMCO BANK) 60 वर्षाच्या प्रथमच निवडणूक (election) बिनविरोध होण्याचा इतिहास नोंदविला गेला आहे. यासाठी सर्वपक्षीय नेते व्यापारी उद्योजक व सभासदांचे प्रयत्न जितके महत्त्वाचे राहिले आहे तितकेच चेअरमन राजेंद्र भोसले (Chairman Rajendra Bhosale) यांच्या कुशल नेतृत्वाखाली संचालक मंडळातर्फे पारदर्शी व एकमताने सुरू असलेल्या कारभारामुळे बँकेची होत असलेली प्रगती हे कारण देखील महत्त्वपूर्ण ठरले आहे राजकारण (politics) विरहित सुरू असलेली वाटचाल जनमान्य झाल्यामुळेच बिनविरोध निवडणुकीचा हा चमत्कार घडू शकला आहे यामुळे मामकोची ही बिनविरोध निवडणूक सहकार क्षेत्रात कार्यरतांना निश्चित मार्गदर्शनाचा दीपस्तंभ ठरेल असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

सहा दशकांपूर्वी 2 ऑक्टोंबर 1962 रोजी महात्मा गांधी (mahatma gandhi) व लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) या दोन राष्ट्रपुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून मामको बँकेची स्थापना केली गेली जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर जिल्हा बँक, शेतकरी संघ, साखर कारखाने, बाजार समित्या, पतसंस्था आदी संस्था उभ्या राहत होत्या मालेगाव शहर (malegaon city) तालुक्याचा विस्तार होत असल्याने स्थानिक व्यापारी उद्योजक विशेषत: लहान व्यावसायिक यांना देखील उत्कर्षासाठी आर्थिक पाठबळ मिळावे या हेतूने स्व. हरीलालदादा अस्मर यांनी शहरात बँक निर्माण करण्याचा विचार कर्मवीर भाऊसाहेब हिरे जवळ मांडला.

कर्मवीर हिरे यांनी देखील या प्रस्तावास तत्काळ संमती देत सहकार्याची भूमिका घेतली. यामुळे उत्साहित झालेल्या अस्मर यांनी केसरीचंद मेहता, हाजी अहमद कच्छी आदी सहकार्‍यांना सोबत घेत मामको बँकेचे रोपटे रोवले. 41 सभासद व त्यांचे 41 हजाराचे भाग भांडवल जमा करत प्रारंभ झालेल्या मामको बँकेची आज 69 हजार पोहोचलेली उलाढाल व 23 हजारावर असलेली सभासद संख्या पाहता या इवल्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले दिसून येते.

हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करताना मुख्य शाखेसह असलेल्या शहर तालुक्यातील आठ शाखा, 273 कोटीवर पोहोचलेल्या ठेवी, नवीन तीन शाखासाठी घेतलेल्या स्वइमारतीच्या जागा, अत्याधुनिक बँकिंग सुविधा, एटीएम, व्यापारी उद्योजक लहान व्यावसायिक व विद्यार्थ्यांना नियमाची होताच सहजतेने उपलब्ध होणारे कर्ज, सेवेसाठी तत्पर अधिकारी सेवक वर्ग विशेष म्हणजे नफा कमविणे हा हेतू न ठेवता महापूर असो की करोनाचे संकट या काळात आपद्ग्रस्तांना मदतीची जपली जात असलेली सामाजिक बांधिलकी आदी मुद्दे मामकोच्या प्रगतीची साक्ष देणारे ठरावे.

मामको बँकेचे संचालक होणे शहरात प्रतिष्ठेचे मानले जात असल्याने व्यापारी तरी या बँकेच्या निवडणुका विधानसभेसारख्या रंगतदार व चुरस पूर्ण होत राहिल्या आहेत मात्र निवडणूक पार पडतात संचालकांचा कारभार मात्र राजकारण विरहित एक मताने होत राहिला आहे हे या बँकेचे आगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल या चुरसपूर्ण निवडणुकीची परंपरा यंदा मात्र खंडित करण्यात चेअरमन राजेंद्र भोसले यांच्या चतुरस्त्र नेतृत्वाला यश आले सहकार्याच्या समृद्ध परंपरेचे जतन करण्याचे बाळकडू भोसले यांना जिल्हा बँक मजूर संस्था चेअरमन व संचालक पदी राहिलेल्या वडील स्वर्गीय लक्ष्मण तात्या भोसले यांच्याकडून मिळाले आहे.

सहकार क्षेत्राशिवाय तळागाळातील गोरगरिबांचा उद्धार शक्य नाही त्यामुळे वडिलांच्या आग्रहामुळेच भोसले सहकार क्षेत्रात कार्यरत झाले सहकारातील गैरप्रकारांचा डाग लागणार नाही याची दक्षता त्यांनी घेतल्यामुळेच तीस वर्षापासून सहकार क्षेत्रात पारदर्शी नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. मामको बँकेच्या 1993 मध्ये झालेल्या निवडणुकीत पॅनल मध्ये न घेतल्याने भोसले यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व प्रचंड मताधिक्यांनी ते विजयी देखील झाले. येथूनच त्यांच्या सहकारातील स्वच्छ प्रतिमेला झळाळी मिळाली यानंतर झालेल्या बँकेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी स्वतंत्र पॅनल करत दोन वेळा संपूर्ण पॅनल देखील निवडून आणले होते.

तालुक्यात दादा भुसे, अद्वय हिरे सुरेश निकम, बंडूकाका बच्छाव आदी नेत्यांचे स्वसाम्राज्याचे स्वतंत्र गट असताना पारदर्शक प्रतिमा व शहर तालुक्यातील प्रामाणिक व चिवट कार्यकर्त्यांच्या बळावर सहकार क्षेत्रात भोसले यांनी स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे, स्वतःचा पक्ष वेगळा असला तरी इतर नेत्यांशी न बाळगलेला पक्षीय द्वेष व थेट लोकसंपर्क यामुळे भोसले यांची या क्षेत्रातील वाटचाल निष्कंटक राहिली आहे नाही म्हणायला काही वर्षांपूर्वी मामको निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या विरोधात पॅनल उभे करण्याचा प्रयत्न करून पाहिला होता.

मात्र, बँकेत भोसले यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शी व एकमताने सुरू असलेल्या कारभारास सभासदांनी पसंती देत त्यांचे पॅनल विजयी करत राजकीय नेत्यांच्या प्रयत्नांना रोखण्याचे काम केले होते हा इतिहास अजूनही सभासद व नेत्यांच्या स्मरणात असावा यामुळे देखील बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना विरोध झाल्याचे दिसून आले नाही. मामको बँकेची भोसले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळातर्फे प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्यानेच यंदा निवडणूक जाहीर होतात सभासद, ठेवीदार व हितचिंतकांतर्फे निवडणूक बिनविरोध असा सूर उमटू लागला होता, कारण बँकेच्या आर्थिक प्रगती बरोबर करोना संकट काळात अडचणीत आलेल्या व्यावसायिक असो की पान, चहा, भाजीविक्रेते आदी किरकोळ विक्रेत्यांना उद्भवलेल्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बँकेने जाचक नियमांना शिथिल करत आर्थिक पाठबळ देत आपली बँक आपली माणसे हे ब्रीद सार्थ करून दाखविले होते.

बँकेने जपलेल्या सामाजिक बांधिलकी मुळेच सभासदांतर्फे बिनविरोधाचा सूर उमटला होता. सभासद, व्यापारी उद्योजकांचा हा कल लक्षात घेत पालकमंत्री दादा भुसे भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, सुनील गायकवाड, काँग्रेस नेते प्रसाद बापू हिरे, माजी आमदार शेख रशीद, आसिफ शेख, आ, मौलाना मुफ्ती, जनता दल नेत्या शाने हिंद निहाल अहमद, आदी सर्वपक्षीय नेत्यांनी पॅनलची न करता किंवा प्रोत्साहन देण्याची भूमिका न ठेवता सभासदांच्या बिनविरोधाच्या भूमिकेला बँकेच्या आर्थिक हितासाठी बळ देण्याचे काम केले.

यामुळे यंदा प्रथमच नामांकन अर्ज अत्यंत कमी प्रमाणात दाखल झाले होते राखीव जागांमध्ये दोनच अर्ज दाखल झाल्याने अशोक मामा बैरागी व छगन बागुल हे भोसले यांच्या पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून यानंतर महिला गटाच्या दोन जागेसाठी तीन नामांकन अर्ज दाखल झाले. परंतु विद्यमान संचालिका मंगला भावसार यांनी देखील माघार घेतल्याने मनीषा देवरे व डॉ.अलका भावसार या बिनविरोध निवडून आल्या. चार संचालक बिनविरोध निवडून आल्याने भोसले यांनी बँक हितासाठी सुरू केलेल्या बिनविरोधाच्या प्रयत्नांना सर्वपक्षीय नेते, सभासद व व्यापारी उद्योजकांच्या समर्थनाची व्याप्ती जावून सर्वसाधारण गटातील 17 तर इतर मागास गटातील आठ इच्छुकांच्या माघारीचे प्रयत्न सुरू झाले.

बिनविरोधासाठी सभासद व सर्वपक्षीय नेते आग्रही असल्याने उर्वरित इच्छुकांनी देखील बँक हितासाठी माघार घेण्याचा मार्ग अवलंबिला ही निवडणूक लढवायचीच या इराद्याने मैदानात उतरलेले सामाजिक कार्यकर्ते देवा पाटील भोसलेंच्या पॅनल मध्ये स्थान न मिळाल्याने नाराज झाले त्यांची देखील समजूत काढण्यास पालकमंत्री दादा भुसे व व्यापारी उद्योजक सामाजिक कार्यकर्त्यांना यश आल्याने मामको बँक निवडणुकीचा मार्ग निष्कंटक होवून बिनविरोधाचा हा इतिहास नोंदवला गेला. पारदर्शी व एकमताने सुरू असलेल्या कारभारामुळे बँकेचे आर्थिक हित अधिक जपले जावे, या उदात्त हेतूने सत्ताधारी गटाकडे सत्ता ठेवण्याचा सभासदांचा कौल चेअरमन राजेंद्र भोसले नेतृत्वावर देखील शिक्कामोर्तब करणारा ठरला असल्याचे अधोरेखित झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com