नाशिक
...अशी आहे वऱ्हाणे गावाची आख्यायिका; पाहा व्हिडीओ
५६ खेडी पाणीपुरवठा योजनेचे पाणी येते महिन्यातून एकदा; गावाने अशी भागवली पाण्याची तहान
नाशिक | प्रतिनिधी Nashik
या गावाची नोंद राम लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाले होते त्याच वेळी ते या गावात आले होते. तेव्हापासून या गावाला वेगळे असे महत्व आहे. याठिकाणी मोठे मंदिर असून पंचक्रोशीतील अनेक गावांतून भक्त याठिकाणी भक्तीभावाने येत असतात. या गावात सध्या पाण्याच्या अडचणी आहेत. ५६ खेडी पाणीपुरवठा योजना आहे पण महिन्याभरात एकदा हे पाणी येत आहे. ही योजना कालबाह्य झाल्याने नियमित पाणीपुरवठा होत नाही. वित्त आयोगाच्या माध्यमातून गावाला एक विहिर खोदली असून येथून सध्या गावाला पाणीपुरवठा होत आहे.