साकुर येथील शेतकऱ्याची आत्महत्या

साकुर येथील शेतकऱ्याची आत्महत्या

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

अतिवृष्टीमुळे Heavy Rain खरीप पिकांची Kharif Crops damaged पूर्णतः वाताहत झाल्याने सोसायटी व हात उसनवार घेतलेले कर्ज Loan फेडायचे कसे या विवंचनेत वैफल्यग्रस्त झालेल्या मालेगाव तालुक्यातील साकुर Malegaon Taluka, Sakur येथील शेतकऱ्याने आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या Suicide केली.

राजू वाल्मीक बागुल Raju Walmik Bagul वय 56 हे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. साकुर शिवारात राजू बागुल यांची 1- 21 हेक्टर शेती आहे खरीप हंगामातील पिकांसाठी त्यांनी साकुर सोसायटीचे 80 हजाराचे कर्ज घेतले होते तसेच गावातून देखील हात उसनवार 30 ते 40 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते खरीप पिकांच्या उत्पादनातून कर्ज फेडण्याची त्यांची मनीषा होती मात्र अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतातील पिकांची पुर्णता वाताहत झाल्याने ते निराश झाले होते.

या नुकसानीची शासनाकडून देखील भरपाई मिळाली नाही त्यामुळे सोसायटी व हात उसनवार कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत ते गेल्या काही दिवसापासून वैफल्यग्रस्त होते यातूनच त्यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सून नातू असा परिवार आहे या घटनेने साकुर गावात शोककळा पसरली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com