मालेगाव पॅटर्न नाशिककरांसाठी उपयुक्त ठरेल : कृषी दादा भुसे
नाशिक

मालेगाव पॅटर्न नाशिककरांसाठी उपयुक्त ठरेल : कृषी दादा भुसे

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात करोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यास अटकाव घालण्यासाठी मालेगाव पॅटर्न अंमलात आणण्याचे संकेत कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले. मालेगाव शहरातील स्थानिक खासगी डॉक्टरांकडून शहरातील रुग्णांवर उपचार करण्यात आले. घरोघरी जाऊन ५० वर्षाच्या पुढील नागरिकांची तपासणी करून पुढील वैद्यकीय कार्यवाही करण्यात आली. नाशिकमध्ये मालेगाव पॅटर्ननुसार उपचार सुरू करण्याबाबत गेल्या आठवड्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच कार्यवाही होणार असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

खरीप आढावा बैठकीपुर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तीन ते चार महिन्यांपासुन करोनामुळे सर्व उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. दररोज वाढणार्‍या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर देखील चांगलाच ताण पडला पडला आहे. दोन महिन्यांपासून मालेगाव हे करोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. परंतु दहा ते बारा दिवसांपासून मालेगावची घटत्या करोना रुग्णांच्या संख्येने मोठा दिलासा मिळाला आहेत. मालेगावी खासगी डॉक्टरांनी रुग्णांवर तत्काळ योग्य उपचार केला. तसेच घरोघरी जाऊन पूर्वीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची तपासणी करून त्यांच्यांवर देखील औषधोपचार सुरू केल्यामुळे करोनाची वाढती रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यास मदत झाली.

त्यामुळे नाशिकमध्ये करोना आढावा बैठकीत कृषीमंत्री ना.दादा भुसे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ व अधिकार्‍यांना मालेगाव पॅटर्नविषयी माहिती दिली. ना.भुजबळ यांनी देखील या पॅटर्नला सहमती दिल्याचे ना.भुसे यांनी सांगितले. त्यामुळे आता नाशिक शहरात मालेगाव पॅटर्ननुसार लवकरच उपचारपद्धती सुरू होण्याची शक्यता आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com