मालेगाव वार्तापत्र: विद्यार्थ्यांची परवड कधी थांबणार ?

मालेगाव वार्तापत्र: विद्यार्थ्यांची परवड कधी थांबणार ?

मालेगाव । हेमंत शुक्ला Malegaon

गत 39 दिवसांपासून सुरू असलेल्या एस.टी. कर्मचार्‍यांच्या (S.T. Employees) संपामुळे शहरासह ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था (Transportation arrangements) पुर्णत: कोलमडून पडली आहे.

नोकरीनिमित्त दररोज ये-जा करणारे चाकरमाने असो की शासकीय कामानिमित्त तालुका (taluka) अथवा जिल्ह्याच्या (district) ठिकाणी जाणारे नागरीक असो त्यांची बसअभावी परवड होवून आर्थिक व मानसिक हाल (Financial and mental condition) होत असले तरी या संपामुळे विद्यार्थ्यांचे (students) होत असलेले नुकसान निश्चित चिंतेचा विषय बनले आहे. शाळा (school) - महाविद्यालयात (college) जाण्यासाठी तालुक्यातूनच सुमारे दहा हजारावर विद्यार्थी (student) एस.टी. बसने (S.T. Bus) दररोज प्रवास करीत होते. मात्र संपामुळे बस बंद असल्याने शाळेत पोहचायचे कसे? या प्रश्नाने विद्यार्थी-विद्यार्थीनी संत्रस्त झाले आहेत.

पालकांना वेळ असेल तर शाळेत जाणे शक्य अन्यथा इच्छा असून देखील बसअभावी शाळा गाठणे अशक्य अशी स्थिती निर्माण झाली आहे. अगोदरच करोना (corona) उद्रेकामुळे दिड वर्षे शाळा बंद (School closed) असल्याने शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. ऑनलाईन शिक्षण (Online learning) मिळत असले तरी त्याचा लाभ सर्वच विद्यार्थ्यांना मिळाला असे नाही. शहरात मोबाईलची ‘रेंज’ (Mobile range) मिळत असली तरी ग्रामीण भागात ती मिळतच होती असे नाही. नेटवर्क (Network) व आर्थिकदृष्ट्या न परवडणारे रिचार्ज यामुळे ऑनलाईन शिक्षण प्रणाली फारशी प्रभावी पडू शकली नाही. ज्यांच्याकडे मोबाईल (mobile) होते त्यांनी शक्य तेवढे ऑनलाईन शिक्षण घेतले.

परंतू आर्थिक परिस्थितीअभावी दहा ते बारा हजार रूपयांचा मोबाईल घेणे ज्यांना शक्य नव्हते अशा कामगार, मजुरांच्या मुलांचा तर ऑनलाईन शिक्षणाशी संबंधच नव्हता. काही शाळा-शिक्षकांनी वाडीवस्तीवर जावून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला परंतू त्याची मर्यादा होत्या. त्यामुळे शाळा सुरू करावी अशी मागणी पालकांसह विद्यार्थ्यांतर्फे सातत्याने केली जात होती. या मागणीची दखल शासनाने घेत दिलासा दिला आहे. परंतू हजारो विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झाल्याच्या आनंदावर बस बंद असल्याने विरजन पडले आहे.

एस.टी. बस सुरू होती तेव्हा शाळा बंद होती आता शाळा सुरू झाली आहे परंतू बस बंद आहे. त्यामुळे आमच्या शिक्षणाची परवड थांबणार तरी केव्हा? असा प्रश्न बसअभावी शाळेत जाता येत नसल्याने शिक्षणाचे होत असलेल्या नुकसानीमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांना पडला आहे. राज्यकर्त्यांनी काहीही निर्णय घ्यावा परंतू एस.टी. बस सर्वप्रथम सुरू करत आमचे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी मागणी आता विद्यार्थ्यांतर्फे जोर धरू लागली आहे. शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी बसचा प्रवास ‘पास’व्दरे करणार्‍या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा आहे.

त्यामुळे खाजगी वाहनातून दामदुप्पट भाडे देवून शाळेत जाणे त्यांना परवडणारे ठरत नाही. त्यामुळे बसअभावी शिक्षणाचे होत असलेले नुकसान विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण करणारे ठरणार नाही याची दक्षता राज्यकर्त्यांसह शासन यंत्रणेस घ्यावी लागणार असून कर्मचार्‍यांचा संप लवकरात लवकर कसा मिटेल या दृष्टीकोनातून निर्णय घेण्याची वेळ आता येवून ठेपली आहे. दिवाळीपासून आठवी ते बारावीनंतर आता सोमवारपासून पहिली ते सातवीच्या शाळा देखील सुरू झाल्या आहेत. शहर-तालुक्यातून सुमारे दहा हजारावर विद्यार्थी मालेगाव (malegaon) आगारातून पास काढत शाळेसाठी बसमधून प्रवास करीत असतात.

मात्र बस बंद असल्याने शाळा गाठायची कशी? या समस्येने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. दिवाळीपासून आठवी ते बारावी पर्यंत शाळा सुरू होणार असल्याने उत्साहीत झालेल्या पाच हजारावर विद्यार्थ्यांनी रांगा लावत येथील आगारातून पास काढले. मात्र दिवाळी संपताच कर्मचार्‍यांचा संप सुरू झाल्याने बससेवा ठप्प झाली. त्यामुळे शाळेत जायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. बस बंद असल्यामुळे पाल्यांना शाळेत सोडणे व परत आणणे अशी नवीन जबाबदारी वाहन असलेल्या पालकांना स्विकारावी लागली आहे. सकाळ व दुपार अशा दोन सत्रात दोन पाल्य जात असल्यास पालकास तारेवरची कसरत करावी लागत आहे.

रब्बी हंगाम सुरू झाला असल्याने शेतीची कामे मजुरांच्या भरवशावर सोडून मुलांना शाळेत सोडण्याची वेळ ग्रामीण भागातील पालकांवर आली आहे. ज्या दिवशी कामामुळे पालकास वेळ मिळत नाही त्यादिवशी शाळेला दांडी अटळ ठरलेली. शाळा-विद्यालये लांब असल्यास किंवा पालक नोकरदार अथवा मजुर असल्यास सोडण्याचा विषयच येत नाही. खाजगी वाहनांचा पर्याय असला तरी दररोज दामदुप्पट भाडे देवून शाळेत जाणे सर्वच विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे शाळेत इच्छा असून देखील बसअभावी जाता येत नसल्याच्या परिस्थितीचा सामना शहरासह तालुक्यातील हजारो विद्यार्थी करत असल्याने संपाचे दुष्पपरिणामाची तीव्रता आता प्रकर्षाने जाणवू लागली आहे.

एस.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे व सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणेच सर्व सोयीसुविधा मिळाव्यात या मागणीसाठी एस.टी. कर्मचारी गत 39 दिवसांपासून संपावर आहेत. त्यामुळे बससेवा ठप्प झाल्याने याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला. हा फटका आर्थिकदृष्ट्या असल्याने प्रवाशी सहन करत आहेत. परंतू शिक्षणालाच ब्रेक लागत असल्याने विद्यार्थी या संपामुळे अक्षरश: त्रस्त झाले आहेत. शिक्षणाच्या काळजीपोटी मिळेल त्या वाहनातून आपले जीव धोक्यात घालत प्रवास करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.

खाजगी वाहनांचे दामदुप्पट भाडे दररोज देणे ज्यांना शक्य आहे असे विद्यार्थी शाळेत जात आहेत. मात्र त्यांची संख्या कमी आहे. शहरासह तालुक्यातच हजारो विद्यार्थी-विद्यार्थीनी आज देखील बसअभावी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या विद्यार्थ्यांच्या अध्ययनास अगोदरच दोन वर्षे करोना उद्रेकामुळे ब्रेक लागला आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने संप लवकरात लवकर मिटविण्याच्या दृष्टीकोनातून घेतला पाहिजे ही तालुक्यातील विद्यार्थ्यांतर्फे होत असलेली मागणी रास्तच म्हटली पाहिजे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com