Malegaon News : चित्रपटगृहात शाहरूखप्रेमींचा फटाके फोडत धुमाकूळ

Malegaon News : चित्रपटगृहात शाहरूखप्रेमींचा फटाके फोडत धुमाकूळ

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

शहरातील कुसूंबारोडवर असलेल्या कमलदिप चित्रपटगृहात सिनेअभिनेता शाहरूख खान याचा जवान हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेषकांनी रात्री 9 वाजेचा शो सुरू झाल्यावर पडद्यावर शाहरूख खान येताच फटाके फोडत व रॉकेट व कारंजे उडवत एकच धुमाकुळ घातला.

तब्बल अर्धा तास फटाके फोडले गेल्याने प्रेषकांमध्ये घबराट पसरून पळापळ झाली. अखेर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलिसांना पाचारण करत चित्रपटाचा शो बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनास घ्यावा लागला. फटाके फोडत गोंधळ घालणार्‍या एकास पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र उर्वरित गोंधळ घालणारे पळून जाण्यात यशस्वी झाले.

Malegaon News : चित्रपटगृहात शाहरूखप्रेमींचा फटाके फोडत धुमाकूळ
Nashik News : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन

येथील कमलदिप चित्रपटगृहात शाहरूख खानचा जवान हा चित्रपट लावण्यात आला आहे. काल शुक्रवार असल्याने जवान चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल होते. रात्री 9 च्या शोला देखील चित्रपटगृह प्रेषकांनी तुडूंब भरलेले होते. पडद्यावर शाहरूखचे आगमन होताच शाहरूख प्रेमी टोळीने आरडाओरड करत फटाके फोडत चित्रपटगृह दणाणून सोडले. फटाके फोडण्याबरोबर रॉकेट व कारंजे देखील उडविले जात असल्याने प्रेषकांमध्ये एकच घबराट पसरून पळापळ सुरू झाली.

हा प्रकार लक्षात येताच चित्रपटगृह व्यवस्थापकांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. तब्बल अर्ध्यातासापेक्षा जास्त वेळ फटाक्यांनी चित्रपटगृह दणाणून सोडणारे पोलिसांना पाहताच फरार झाले. या गोंधळामुळे सुदैवाने पडदा वाचला मात्र अनेक खुर्च्यांची नासधूस झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून चित्रपटाचा शो बंद करण्याचा निर्णय कमलदिप संचालकांना घ्यावा लागला.

काही दिवसांपूर्वी मोहन चित्रपट गृहातदेखील जवान चित्रपटच प्रदर्शन सुरू असतांना फटाके फोडण्याचा प्रकार घडला होता. शहरात सलमान व शाहरूख खान प्रेमींच्या टोळ्या कार्यरत आहेत. या सिनेकलावंतांचे चित्रपट लागल्यावर चित्रपटगृहात फटाके फोडून धुमाकुळ घालण्याचे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले आहेत.

Malegaon News : चित्रपटगृहात शाहरूखप्रेमींचा फटाके फोडत धुमाकूळ
Nashik News : अजित पवारांच्या स्वागताच्या बॅनरवरून शरद पवारांचा फोटो गायब
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com