मालेगाव मनपाची जंतनाशक मोहिम प्रारंभ

मालेगाव मनपाची जंतनाशक मोहिम प्रारंभ

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमी दोषाचे (Intestinal worm defects) उच्चाटनासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत (National deworming campaign) 1 ते 19 वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप (Distribution of deworming tablets) महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक-माध्यमिक शाळांमध्ये (Primary-secondary schools) तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center) व अंगणवाडीत (Anganwadi) सुरू करण्यात आले आहे.

पालकांनी आपल्या पाल्यांना या जंतनाशक गोळ्या द्याव्यात, असे आवाहन महापौर ताहेरा शेख रशीद (Mayor Tahera Sheikh Rashid) व आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी केले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक शाळांसह शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी 21 ते 28 सप्टेंबरदरम्यान राष्ट्रीय जंतनाशक मोहिम मनपातर्फे राबवली जात असून या केंद्रांवर जंत नाशक गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व पालकांनी आपले 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या द्याव्यात, असे आवाहन आयुक्त गोसावी यांनी केले आहे.

1 ते 19 वयोगटातील किमान 28 टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमी दोष हा मातीतून प्रसारीत होणार्‍या जंतापासून होतो. त्याचे प्रमुख कारण म्हणजे परिसर अस्वच्छ असणे हे आहे. कृमी दोष हा रक्तक्षय (Anemia) आणि कुपोषणाचे (Malnutrition) कारण असून बालकांची शारिरीक व बौध्दीक वाढ (Physical and intellectual growth of children) खुंटण्यास कारण ठरत आहे.

हे लक्षात घेवून 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना जवळच्या शाळा व अंगणवाडी केंद्रात गोळी देवून बालकांचे व मुलांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उद्दीष्ट आहे. 1 ते 2 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी दोनशे मिली ग्रॅम गोळी चुरा पावडर करून पाण्याबरोबर देण्यात येईल

2 ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना चारशे मिली ग्रॅमची गोळी चुरा पावडर अथवा तुकडे करून चावून खाण्यास पाण्याबरोबर देण्यात येणार आहे. अल्बेडेझॉलची गोळी (Albedazole tablet) उपाशीपोटी देण्यात येवू नये, गोळी खाल्ल्यामुळे कोणतेही दुष्पपरिणाम होत नाही. जंतांचा प्रादुर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचितप्रसंगी मुलांना उलटी होवू शकते हे दुष्पपरिणाम किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जावू नये, असे आवाहनही महापौर ताहेरा शेख व आयुक्त गोसावी यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com