मालेगाव: अतिक्रमणास मनपा, पोलीस जबाबदार : शेख रशीद

मालेगाव: अतिक्रमणास मनपा, पोलीस जबाबदार : शेख रशीद

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

मनपा (Municipal Corporation), पोलीस व महसूल (Police and revenue) यंत्रणेच्या दुर्लक्षामुळेच संपुर्ण शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. या अतिक्रमणांमुळे (Encroachment) नागरीक त्रस्त झाले असून अपघातांच्या (accidents) घटना देखील वाढल्या आहेत.

रस्ते (road), गटारी (Gutters) आदी विकासकामांना देखील अतिक्रमणांमुळे विलंब होत असून मनपा आयुक्त (Municipal Commissioner) व अधिकार्‍यांकडे याबाबत तक्रार करून देखील अतिक्रमण (Encroachment) काढण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आ. शेख रशीद (Former NCP MLA. Sheikh Rashid) यांनी येथे बोलतांना केला. उद्या होणार्‍या महासभेनंतर प्रशासनाने अतिक्रमण विरोधी मोहिम (Anti-encroachment campaign) हाती न घेतल्यास आपण स्वत: कार्यकर्त्यांसह जुना आग्रारोड व कुसूंबारोडवरील अतिक्रमणे काढण्याचे काम हाती घेवू. यामुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीस प्रशासन यंत्रणाच जबाबदार राहिल, असा इशारा शेख रशीद यांनी पुढे बोलतांना दिला.

येथील राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालयात (Nationalist Congress Liaison Office) आयोजित पत्रकार परिषदेत माजी आ. शेख रशीद यांनी शहरात मोठ्या प्रमाणात फोफावत असलेल्या अतिक्रमणास मनपासह पोलीस व महसूल यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप केला. पदाधिकारी-नगरसेवकांतर्फे तक्रारी करण्यात येवून देखील रस्त्यावरील अतिक्रमणे काढली जात नसल्याने त्याचा त्रास शहरवासियांना होत आहे.

रस्त्यावरच दुकाने थाटली जात असल्याने वाहतूक कोंडीसह (Traffic jam) अपघाताच्या (accidents) घटना देखील वाढल्या आहेत. कोट्यवधी रूपयांच्या निधीतून (fund) प्रमुख रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. मात्र अतिक्रमणांमुळे या रस्त्याच्या कामांना विलंब होत आहे. आयुक्तांसह संबंधित अधिकार्‍यांचे याकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप शेख रशीद यांनी पुढे बोलतांना केला.

मनपा आयुक्त एक-दोन दिवसांसाठीच महानगरपालिकेत येतात. नाशिक (nashik) व मंत्रालयातील बैठकींचे कारणे ते देतात. परंतू गत एक वर्षापासून त्यांचा मनपात कमी येण्याचा खेळ सुरू आहे. आयुक्तच थांबत नसल्याने अधिकारी व सेवक देखील गायब असतात. आयुक्तांचा वचक नसल्याने संपुर्ण यंत्रणाच विस्कळीत झाली आहे.

जनतेची नाही तर फक्त विरोधात बोलणार्‍यांची कामे अधिकार्‍यांतर्फे केली जात असल्याचा आरोप करत शेख रशीद पुढे म्हणाले, शहरातील अतिक्रमणांमुळे नागरीक अक्षरश: त्रस्त झाले आहेत. त्यामुळे उद्या होणार्‍या महासभेनंतर मनपा प्रशासनाने अतिक्रमण विरोधी मोहिम हाती न घेतल्यास आपण स्वत: कार्यकर्त्यांसह कुसूंबारोड व जुना आग्रारोडवरील अतिक्रमणे काढण्याची कामे हाती घेवू. यावेळी होणार्‍या सर्व परिस्थितीस मनपासह पोलीस यंत्रणाच जबाबदार राहिल, असा इशारा त्यांनी दिला.

मध्यचे आ. मौलाना मुफ्ती यांनी 60 महिन्यात 60 कामे करण्याचे वचन शहरवासियांना दिले होते. मात्र एकही ठोस काम त्यांनी केले नाही. न झालेल्या कामांचे उद्घाटने मात्र आमदारांतर्फे केले जात असल्याची टिका शेख रशीद यांनी केली. आमची सर्व विकासकामे जमीनीवर दिसत आहे. मौलानांनी एक काम तरी जनतेस दाखवले पाहिजे.

शहरात कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आणलेल्या 100 कोटीच्या निधीत मनपाचा 30 टक्के वाटा राहणार आहे. यातून 4 पूल व रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. या विकासकामांचा लाभ सर्वधर्मीय जनतेस होणार आहे. मात्र विरोधकांकडे जनतेस दाखविण्यास विकासकामे नसल्याने ते होत असलेल्या विकासकामांबद्दल जनतेत दिशाभुल करण्याचा उद्योग करीत असल्याचा आरोप शेख रशीद यांनी शेवटी बोलतांना केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com