मामको व्यवस्थापकीय संचालक मंडळाची निवड

अध्यक्षपदी कोतकर; कर सल्लागार; उद्योजकांचा समावेश
मामको व्यवस्थापकीय संचालक मंडळाची निवड
USER

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या येथील मालेगाव मर्चन्टस् को-ऑप. बँकेत (Malegaon Merchants Co-op. Bank) सहा सदस्यीय व्यवस्थापकीय संचालक मंडळाची (Member Managing Board of Directors) स्थापना करण्यात आली आहे. या संचालक मंडळाच्या (Board of Directors) अध्यक्षपदी (President) बाजार समिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भिका कोतकर यांची निवड केली गेली.

या व्यवस्थापकीय संचालक मंडळात विद्यमान चेअरमन राजेंद्र भोसले, संचालक सतिष कासलीवाल यांच्यासह शहरातील कर सल्लागार राजेश जाखोट्या, उपेंद्र मेहता, उद्योजक व चार्टर्ड इंजिनिअर रविंद्र ओस्तवाल यांचा समावेश करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) नागरी सहकारी बँकांचे (Civil Cooperative Banks) कामकाज अधिक कार्यक्षम व गतीमान (Efficient and fast) होण्याच्या दृष्टीकोनातून शंभर कोटीपेक्षा जास्त ठेवी असणार्‍या सर्व नागरी सहकारी बँकांना व्यवस्थापकीय संचालक मंडळाची स्थापना करण्याबाबत सुचना केल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर नागरी बँकांनी आपल्या उपविधीत दुरूस्ती करून घेत व्यवस्थापक संचालक मंडळाची नेमणूक करण्यास प्रारंभ केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या सुचनेनुसार मामको बँकेने देखील उपविधीत दुरूस्ती करत सहा सदस्यांचे व्यवस्थापकीय संचालक मंडळ स्थापन केले असून या व्यवस्थापकीय संचालक मंडळाची बैठक होवून अध्यक्षपदी भिका पांडुरंग कोतकर यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती चेअरमन राजेंद्र भोसले यांनी दिली.

बँकेचे कामकाज अधिक कार्यक्षम व गतीमान होण्याच्या दृष्टीकोनातून रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. व्यवस्थापकीय संचालक मंडळास बँकेचा एनपीए कमी करणे, थकित कर्ज वसुलीसाठी (Debt recovery) प्रयत्न, संचालक मंडळासमोर येणार्‍या कर्ज प्रकरणांची योग्य पडताळणी करणे, बँक निधी (fund) गुंतवणुकीचे योग्य व्यवस्थापन तसेच बँकेच्या अंतर्गत व्यवस्थापनावर लक्ष ठेवण्यासह रिझर्व्ह बँकेच्या धोरणांची-योजनांची बँकेच्या माध्यमातून अंमलबजावणी करणे, संचालक मंडळांच्या सुचनांवर कार्य करण्याचे काम व्यवस्थापकीय संचालक मंडळास करावे लागणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

मामकोच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाचा बँकेच्या सभेत व्हा. चेअरमन गौतम शाह, ज्येष्ठ संचालक शरद दुसाने, अ‍ॅड. भरत पोफळे, सतिष कलंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात येवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या गेल्या. यावेळी संजय दुसाने, नरेंद्र सोनवणे, दादाजी वाघ, सतिष कासलीवाल, नंदूतात्या सोयगावकर, छगन बागुल, विठ्ठल बागुल, चंदूबापू पाटील, जनरल मॅनेजर कैलास जगताप, विलास होनराव, संजय अहिरे आदी संचालक, बँकेचे अधिकारी, सेवक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com