मालेगाव: पाण्याच्या निचर्‍यासाठी भुयारी गटार करा

मालेगाव: पाण्याच्या निचर्‍यासाठी भुयारी गटार करा

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

कॉलेज मैदानावर साचणार्‍या पावसाच्या पाण्याचा निचरा (Rainwater drainage) होण्यासाठी मोसम नदीपर्यंत (Mosam river) मोठी भुयारी गटार (Underground sewer) करण्यात यावी, अशी मागणी

मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी (Municipal Commissioner Bhalchandra Gosavi) यांच्याकडे आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने केली आहे. निवेदनात (memorandum) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) नियोजनशून्य कारभारावरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

कॉलेज मैदानावर करोडो रुपये खर्चून बनविण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅकवर (Jogging track) पहिल्याच पावसाचे पाणी साचले असून या मैदानावर प्रत्येक वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. याबाबत मागील काळात एक मोठी भुयारी गटार कॉलेज मैदान ते मोसम नदीपर्यंत बनविण्यात यावी, अशी मागणी तत्कालीन नगरसेवक गुलाब पगारे यांच्या वतीने आंदोलन (agitation) करून करण्यात आली होती. त्यास आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने सक्रिय पाठिंबा दिला होता.

एवढ्या मोठ्या कॉलेज मैदानासह पोलीस कवायत मैदानावर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जॉगिंग ट्रॅक (Jogging track) बनविण्याआधी गटारीचे काम होणे आवश्यक होते. दूरदृष्टी ठेवून ते काम पूर्ण न करता जॉगिंग ट्रॅक बनविण्यात आला. त्यामुळे पहिल्याच पावसात तो पाण्याखाली गेला. शहरातील नागरिकांचे आरोग्य व पायी फिरण्यासाठी मोठे विकासकाम झाले असतांना त्याचे नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) अभियंत्यांना अभियांत्रिकीचे निश्चितच ज्ञान आहे, परंतु विकासकामे करतांना दूरदृष्टी ठेवून नियोजनबद्ध व गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाच्या पाण्याच्या निचरा करण्याचे नियोजन पूर्वीच केले पाहिजे होते. जनतेच्या कररुपी पैशांचे योग्य नियोजन केले नसल्याचा आरोप देखील निवेदनात करण्यात आला.

जॉगिंग ट्रॅक व मैदान महापालिका हद्दीत असून त्याची देखरेख व ते जास्त कसे टिकेल; ह्या दृष्टीकोनातून मनपाने त्याची काळजी घ्यावी या भावनेतून कॉलेज मैदानाचे पाणी निघण्यासाठी मोठी भुयारी गटार मोसम नदीपर्यंत बनविण्यात यावी, ही मागणी प्रामुख्याने करण्यात आली आहे. यावेळी पुरुषोत्तम काबरा, निखील पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, विवेक वारुळे, कपिल डांगचे, प्रवीण चौधरी आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com