मालेगाव: राष्ट्रपती शपथविधीचे थेट प्रसारण; भाजपकडून आतषबाजी

मालेगाव: राष्ट्रपती शपथविधीचे थेट प्रसारण; भाजपकडून आतषबाजी

मालेगाव । प्रतिनिधी | Nashik

देशातील सर्वोच्च घटनात्मक पद (highest constitutional post) असलेल्या राष्ट्रपतीपदी (President) निवड झालेल्या द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा शपथविधी सोहळा (Swearing in ceremony) संसद भवनाच्या (Parliament House) सेंट्रल हॉलमध्ये आज सकाळी मोठ्या उत्साहात पार पडत असतांना शहरातील मोसमपुलावरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटत एकच जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला.

आदिवासी कन्या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्याने आदिवासी बांधवांनी (tribal community) पारंपारिक आदिवासी नृत्य (Tribal dance) करीत शपथविधी सोहळ्याचा आनंद व्दिगुणित केला. पारंपारिक वेशभुषेत आदिवासी बांधवांनी केलेल्या नृत्यात भाजपचे (BJP) पदाधिकारी-कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. हा शपथविधी सोहळा (Swearing in ceremony बघता यावा यासाठी एलईडी स्क्रिन (LED screen) देखील लावण्यात आल्याने सर्वसामान्य नागरीक देखील हा सोहळा पाहण्यासाठी मोसमपुलावर थांबले होते.

भारत माता की जय, वंदे मातरम्, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) जयघोषाने कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. राष्ट्रपती मुर्मू यांचा शपथविधी पार पडताच उपस्थित आदिवासी महिला-पुरूषांसह नागरीकांनी भाजपनेते अव्दय हिरे, जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, सुनिल गायकवाड आदींसह पदाधिकार्‍यांनी पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.

भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती पदाची (Presidency) सुत्रे आदिवासी कन्या द्रौपदी मुर्मू या स्विकारणार असल्याने शहर भाजपातर्फे या शपथविधी सोहळ्यानिमित्त गांधी पुतळ्याजवळ आनंदोत्सव सोहळ्याचे आयोजन युवकनेते अव्दयआबा हिरे, सुनील गायकवाड, सुरेश निकम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. शपथविधीचे प्रक्षेपण होण्यासाठी मोठा स्क्रिन याठिकाणी लावण्यात आला होता.

शपथविधीस प्रारंभ होताच फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. यावेळी अहवा येथील बंडु पावरा व मुल्हेर येथील बिजू पावरा यांच्या नृत्य पथकाने पारंपारिक वेशभुषेत आदिवासी नृत्यास प्रारंभ करीत राष्ट्रपतींच्या शपथविधीचा आनंद व्दिगुणित केला. या नृत्यात हिरे, गायकवाड, निकम यांच्यासह नितीन पोफळे, मदन गायकवाड, आरूण पाटील, विजय देवरे, दादा जाधव, नीलेश कचवे, दीपक देसले, विवेक वारूळे, संजय काळे, भरत बागुल, नंदूकाका शिरोळे, विजय देसाई, भारत म्हसदे, गुलाब पगारे, सुधीर जाधव, संजय निकम आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

श्रावण महिन्यापुर्वीच राष्ट्रपतीपदी आदिवासी कन्या द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्याने देशात दीपोत्सव सुरू झाला असून त्यांच्या कर्तृत्वपुर्ण असलेल्या कामाच्या धडाडीमुळे देशाला न्याय मिळेल अशा शब्दात अव्दय हिरे यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्या निवडीचे स्वागत केले. आधुनिक भारताचे विकासपुरूष पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रगतीपथावर घोडदौड करत आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी बांधवांचे वंशज विराजमान होवू शकले ते केवळ पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह यांच्या निर्णयामुळे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत स्वत:चे कर्तृत्व सिध्द करणार्‍या राष्ट्रपती मुर्मू यांची निवड देशाच्या मुळ नागरीकाला न्याय देणारी ठरली असल्याचे हिरे यांनी शेवटी बोलतांना सांगितले.

भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा क्षण द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्याने आला आहे. आदिवासी महिलेला सर्वोच्च स्थान देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विश्वास हे सार्थ करून दाखवले आहे. या निवडीने आदिवासी बांधवच नाही तर संपुर्ण देशवासिय आनंदी झाले असल्याचे प्रतिपादन मनपा गटनेते सुनिल गायकवाड यांनी यावेळी बोलतांना केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, अरूण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या आनंदोत्सव कार्यक्रमास प्रदेश संयोजक दादा जाधव, उद्योग आघाडीचे संयोजक नितीन पोफळे, लकी खैरनार, मदन गायकवाड, तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, दीपक देसले, सलीम पिंजारी, प्रदीप बच्छाव, देवा पाटील, दिलीप बच्छाव, राजेंद्र शेलार, हरिप्रसाद गुप्ता, राकेश शिंदे, सोमनाथ वडगे, सोनू आसी, दीपक गायकवाड, दीपक शिंदे, दिनेश साबणे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com