माळेगाव औद्योगिक वसाहत विस्तारणार; उद्योगमंत्री सामंत यांचे आश्वासन

माळेगाव औद्योगिक वसाहत विस्तारणार; उद्योगमंत्री सामंत यांचे आश्वासन

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

औद्योगिक क्षेत्राला (Industrial sector) चालना देण्यासाठी तालुक्यातील माळेगाव (malegaon) औद्योगिक वसाहतीतील (Industrial estates) टप्पा क्रमांक दोन वरील भूखंडावर पायाभूत सुविधा (infrastructure) उभ्या करण्यासह वितरणाला गती देण्यासाठी ले-आउटचे काम हाती घेण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse), खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse), आमदार सीमा हिरे (MLA Seema Hirey) यांच्यासह ‘सीमा’चे अध्यक्ष के. एल.राठी, सचिव बबनराव वाजे, उपाध्यक्ष किरण भंडारी, रतन पडवळ, स्टाइसचे चेअरमन नामकर्ण आवारे यांच्यासोबत विविधांगी चर्चा झाली.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (Maharashtra Industrial Development Corporation) भूसंपादन महाव्यवस्थापक डॉ. संदीप आहेर (Land Acquisition General Manager Dr. Sandeep Aher), जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan D.), औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी नितीन गवळी (Industrial Development Corporation Divisional Officer Nitin Gawali), सहाय्यक सचिव देगावकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.

वसाहतीचा विस्तार हाती घेण्यात आला आहे. त्याकरीता टप्पा क्र. दोनमध्ये 200 एकर भूखंडावर पायाभूत सुविधा (infrastructure) निर्माण करण्यात याव्यात, भूखंडाचे वितरण सुरु करण्यात यावे, अशी मागणी संघटनेने यावेळी उद्योगमंत्र्यांकडे केली. यावर सामंत यांनी अधिकार्‍यांना तात्काळ ले-आऊट पाडण्याच्या सूचना केल्या.

एक हजार एकर जागेची मागणी

मापरवाडीजवळ एक हजार एकर क्षेत्रावर औद्योगिक वसाहत प्रस्तावित केली आहे. त्याची भूसंपादन प्रक्रिया सुरू करुन सुविधा निर्माण कराव्यात. भूखंडाचे वितरण करावे, अशी मागणी उद्योजकांनी केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले. उद्योजकांना पुरेशा दाबाने वीज उपलब्ध व्हावी. याकरिता वसाहतीत 33/11 केव्हीएच्या वीज उपकेंद्राकरिता प्लॉट उपलब्ध करून देण्यात यावा. वसाहतीत मुकुंद कारखान्याच्या 42 एकर जागेवर प्लॉट पाडून उद्योजकांना देण्यात यावेत अशी मागणीही यावेळी करण्यात केली.

मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद

औद्योगिक वसाहतीत मुख्य रस्ता चौपदरी करण्यात यावा, औद्योगिक वसाहतीतील कचरा व्यवस्थापन करण्याची मागणी वाजे यांनी केली. सामंत यांनी ती मान्य करत जिल्हाधिकार्‍यांना याबाबत लगेचच आदेश दिल्याने संघटनेने त्यांचे आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com