मालेगाव: महासभेत सत्तारूढ-विरोधकांत खडाजंगी

मालेगाव: महासभेत सत्तारूढ-विरोधकांत खडाजंगी

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

माहिती न देताच सादर केलेले भुखंड खरेदीचे मंजुरी प्रस्ताव (Proposal for purchase of plot), गिरणा पंपिंग स्टेशनवरील (Girna pumping station) नादुरूस्त पंपाच्या दुरूस्ती खर्चाच्या मुद्यावरून महासभेत सत्तारूढ-विरोधी गटाच्या नगरसेवकांनी (Corporators) प्रशासनास चांगलेच धारेवर धरले.

भुखंड खरेदीचे प्रस्तावावरून महागठबंधन व एमआयएम व सत्तारूढ गटाच्या नगरसेवकांमध्ये शाब्दीक चकमक झडल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जावू नये यास्तव महापौरांना भुखंड खरेदीचे सहाही प्रस्ताव तसेच स्थानिक वरिष्ठ अधिकार्‍यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव तहकूब करण्याची घोषणा करावी लागली. शहरातील अस्वच्छता (Uncleanliness), विस्कळीत पाणीपुरवठा (Disrupted water supply), नाले सफाईसाठी (Drain cleaning) जेसीबी (JCB) देण्यास टाळाटाळ, रूग्णालयातील चोरी आदी प्रश्नांवर संतप्त नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले.

गिरणा योजनेवरील वापराविना नादुरूस्त झालेल्या चार पंपांची चौकशी करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी यावेळी संतप्त नगरसेवकांनी यावेळी केली. वादळी चर्चेअंती नवीन आठ पंप खरेदीसाठी निविदा प्रक्रिया (Tender process) राबविण्यासह रामलिला मैदानावर उद्यान तसेच गिरणा नदीकाठावर (girna river) घाट बांधण्यासाठी शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे दोन कोटीचा प्रस्ताव तसेच शहरातील विविध संस्था, संघटनांना रेडीरेकनर दराप्रमाणे मोकळे भुखंड देण्यासह विविध चौक-रस्त्यांना नावे देण्याचा ठराव यावेळी मंजूर केले गेले.

करोना (corona) उद्रेकामुळे गत दोन वर्षापासून होत असलेली ऑनलाईन महासभा (Online General Assembly) प्रथमच ऑफलाईनव्दारे सभागृहात महापौर ताहेरा शेख (Mayor Tahera Sheikh) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी (Additional Commissioner Ganesh Giri), नगरसचिव शाम बुरकूल (Municipal Secretary Sham Burkul) यावेळी उपस्थित होते.

सभेस प्रारंभ होताच शहरातील अस्वच्छतेमुळे मच्छरांचे साम्राज्य पसरून नागरीकांचे आरोग्य (health) धोक्यात आले असतांना मनपा प्रशासनातर्फे स्वच्छतेसाठी उपाययोजना केल्या जात नसल्याने संतप्त झालेल्या महागठबंधनचे नगरसेवक अ‍ॅड. गिरीश बोरसे, साजीद अन्सारी, अय्याज हलचल यांनी महापौरांसमोरील जागेवर ठिय्या मांडत उपाययोजना करण्याची मागणी केली. अ‍ॅड. बोरसे यांनी अस्वच्छतेमुळे रोगराई वाढून नागरीक हवालदिल झाले आहे. प्रशासन स्वच्छता करणार तरी कधी? असा जाब विचारला. महापौरांनी याप्रश्नी महासभा होताच चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिल्याने संतप्त नगरसेवक पुन्हा आपल्या जागेवर गेले.

भुखंड खरेदीच्या प्रस्तावाची सुचना मांडली जात असतांनाच एमआयएम गटनेते डॉ. खालीद परवेज, महागठबंधनचे मुस्तकीम डिग्नेटी यांनी भुखंड खरेदी प्रस्तावांवर जोरदार हरकत घेतली. सदस्यांना माहिती नसतांना भुखंड खरेदी केले जात आहे. यामागे मोठा गौडबंगाल असल्याची टिप्पणी डॉ. खालीद यांनी केल्याने माजी महापौर शेख रशीद यांनी तीव्र हरकत घेतली. यामुळे या तिघा सदस्यांमध्ये शाब्दीक चकमक सुरू झाल्याने चर्चेऐवजी वादच निर्माण केला जात असल्याचे लक्षात आल्याने महापौरांनी भुखंड खरेदीचा प्रस्ताव तहकूब केला.

गिरणा धरणावरील नादुरूस्त चार पंप दुरूस्तीसाठी 3 कोटी 71 लाखाचा खर्च करावे लागणार असल्याने या प्रस्तावावरून नगरसेवक संतप्त झाले. माजी महापौर शेख रशीद, भाजप गटनेते सुनिल गायकवाड, डॉ. खालीद परवेज, मुस्तकीम डिग्नेटी, असलम अन्सारी, सखाराम घोडके आदी सदस्यांनी या प्रस्तावाच्या हेतुबद्दलच शंका उपस्थित केली. नवीन एक पंप 45 लाखास येत असतांना चार पंप दुरूस्तीसाठी दुप्पट खर्च करण्याचे कारणच काय? असा जाब सदस्यांनी विचारला. पंप न वापरता खराब झालेच कसे त्यामुळे अधिकारी, कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडला असल्याने या प्रकरणी चौकशी करून दोषी अधिकारी-सेवकांकडून रक्कम वसुल करावी, अशी मागणी संतप्त सदस्यांनी केली. यानंतर नवीन आठ पंप खरेदी करण्याच्या प्रस्तावास महासभेत मान्यता देण्यात आली.

शहरात उडालेल्या अस्वच्छतेच्या प्रश्नावरून भाजप गटनेते सुनिल गायकवाड, मदन गायकवाड, महागठबंधनचे अ‍ॅड. गिरीश बोरसे, शिवसेना नगरसेविका आशा अहिरे आदी सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले. नालेसफाईसाठी बुलडोझर देण्यास टाळाटाळ कां केली जाते असा जाब यावेळी नगरसेवकांनी विचारला. मनपा रूग्णालयात झालेली चोरीची घटना व उपचारासाठी रूग्णवाहिका देण्यास केली जात असलेली टाळाटाळ यावरून काँग्रेसचे सभागृहनेते असलम अन्सारी यांनी आरोग्याधिकार्‍यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली.

रामलिला मैदानाचे सुशोभिकरण

भाजप गटनेते सुनिल गायकवाड यांनी गिरणा नदीकाठी असलेल्या रामलिला मैदान परिसरात उद्यान, लॅडस्केपींग तसेच नदीकाठावर घाट बांधण्याच्या कामासाठी 2 कोटी रूपयांचा प्रस्ताव तयार करून तो शासनाच्या पर्यटन विभागास सादर करण्याचा मांडलेला प्रस्ताव महासभेत मंजूर केला गेला. याबरोबरच शहरातील मोकळे भुखंड सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी विविध संस्था व संघटनांना रेडीरेकनर दराप्रमाणे तसेच विविध चौक-रस्त्यांना नावे देण्याचा ठराव मंजूर केला गेला.

विकासकामांसाठी ठेकेदारास सक्षम प्राधिकार्‍याकडून ना हरकत बंधनकारक करण्याचा यापुर्वी महासभेने केलेला ठराव या महासभेत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजप नगरसेवक मदन गायकवाड यांनी मोसमपुल भागातील म. गांधी पुतळ्याजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रवेशव्दार मनपाने उभारावे, अशी जोरदार मागणी केली. महासभेतील चर्चेत विरोधी पक्षनेत्या शानेहिंद निहाल अहमद, माजी सभापती जयप्रकाश बच्छाव, राजाराम जाधव, संजय काळे, एजाज बेग, माजीद युनूस ईसा, शेख कलीम दिलावर आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.