सुरगाणा
सुरगाणा
नाशिक

सुरगाणा : 'जिल्हा परिषद शाळेने साकारला 'वृक्षगणेशा'

ना मी मंदीरात, ना मी दगडात, मी तर आहे वृक्षांत

Gokul Pawar

Gokul Pawar

सुरगाणा | Surgana

निऱ्हाळे येथील माध्यमिक विद्यामंदिर या शाळेने पर्यावरणपूरक अभिनव उपक्रम राबवून श्रीगणेशाची स्थापना केली आहे. शाळेने झाडावर श्रीगणेश साकारून पर्यावरणपूरक गणेशाचा आदर्श इतरांसमोर ठेवला आहे. मला झाडांमध्ये पहा असा संदेशच जणू जनतेला देण्याचा प्रयत्न शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी केला आहे.

सदर गणरायासमोर "ना मी मंदीरात, ना मी दगडात, मी तर आहे वृक्षांत " असा संदेश लिहिला असून याद्वारे आजच्या आधुनिक युगात पर्यावरण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे असा संदेश यातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी शाळेतील मुलांनी घरीच शाडू मातीचे गणपती स्वतः तयार करून त्याला रंग देऊन गणपती बसविले आहेत. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे म्हणून निऱ्हाळे शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव कुटे, शिक्षक किशोर सरवार, राजाराम आव्हाड आदींच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले आहेत.

या शाळेत यापूर्वी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात झाडांची लागवड करून शालेय परिसर सुंदर आणि रम्य बनविला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com