येवला-नाशिक रस्ता राष्ट्रीय महामार्ग करा
File Photo

येवला-नाशिक रस्ता राष्ट्रीय महामार्ग करा

येवला | प्रतिनिधी Yeola

राज्य महामार्ग (State highways) असलेले कोपरगाव-मनमाड (Kopargaon-Manmad) ते मालेगाव (Malegaon) व वैजापूर- येवला-विंचूर ते नाशिक (Nashik) हे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत. या मार्गांचे राष्ट्रीय महामार्गात (national highways) समावेश करून त्यांचा कायापालट करावा, अशी मागणी भाजप (BJP) नेते बाबा डमाळे, आनंद शिंदे यांनी केंद्रींय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport Minister Nitin Gadkari) यांंच्याकडे केली आहे.

याप्रसंगी राज्यमंत्री भारती पवार (Minister of State Bharti Pawar), केदा आहेर, प्रा. सुनील बच्छाव उपस्थित होते. निवेदनात म्हटंले आहे की, येवला तालुक्यातून (Yeola Taluka) जाणारे राज्य मार्ग रहदारीचे व महत्त्वपूर्ण शहरांना जोडणारे आहेत. येवला,लासलगाव (Lasalgaon) येथे कांदा (Onion), मका, द्राक्ष, कापाशीची मोठी व्यापारपेठ आहे. येवल्याची पैठणी (Paithani) प्रसिद्ध आहे, हातमाग व्यवसाय (Handloom business), बरोबरच शिर्डी (Shirdi) साईबाबा (saibaba), वणी देवस्थान, कोटमगाव देवस्थान, मुंबई (Myumbai),

गुजरात (Gujrat), मध्यप्रदेश (Madhya Pradesh) कडे जाण्याचे महत्त्वाचे मार्ग आहे. मनमाड (Manmad), लासलगाव, येवला, नगरसूल रेल्वे मार्गाने येणार्‍या प्रवाशांंची वाहतूक मोठी आहे. तसेच या मार्गावरून मराठवाडा (Marathvada), विदर्भ (Vidarbha), गुजरात, मध्यप्रदेश, दक्षिण भारताकडे या भागातून मोठी मालवाहतूक होत असते. त्याच बरोबर विंचूर-लासलगाव ते मनमाड जाणार्‍या मार्गावर कांदा मार्केट, द्राक्ष बाजारपेठ, नाफेड सह प्रवासी, विद्यार्थी अशा प्रमाणात वाहतूक आहे.

वरील काही व अन्य रस्ते केंद्रीय रस्ते वाहतुकीत येत नाहीत. असे असले तरी येवला-पाटोदा ते लासलगाव, येवला-भारम ते रेंडाळे, येवला-नगरसूल ते राजापूर असे येवला शहराशी व मुख्य मार्गाशी जोडले जाणारे रस्ते आहेत. तर लासलगाव ते पिंपळगाव, देवगाव फाटा ते बोकडदरे (म्हसोबामाथा) हे रस्ते दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे आहे. यावेळी नानासाहेब लहरे, दिनेश परदेशी, युवराज पाटोळे, राजेंद्र मोहरे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.