‘चला जाणुया नदीला’ अभियान यशस्वी करा: जिल्हाधिकारी गंगाथरन डी.

‘चला जाणुया नदीला’ अभियान यशस्वी करा: जिल्हाधिकारी गंगाथरन डी.

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नद्या बाबत जनसामान्यांशी संवाद, समन्वय, नद्यां (rivers) बाबतची माहिती जाणून घेण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या औचित्याने चल जाणुया नदीला अभियान शासनाने हाती घेतले आहे.

जिल्ह्यातील सर्व संबधीत प्रशासकीय यंत्रणांनी जनसहभागातून हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan D.) यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) झालेल्या चला जाणुया नदीला (river) या अभियानासाठी गठित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत बोलत होते.

यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिशा मित्तल (Zilha Parishad Chief Executive Officer Amisha Mittal), राज्यस्तरीय समितीचे अशासकीय सदस्य राजेश पंडित, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे दिंडोरी उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी,

इगतपुरी -त्र्यंबकेश्वर उप विभागीय अधिकारी तेजस चव्हाण, बालगाण उपविभागीय अधिकारी बबन काकडे, मालेगाव उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, येवला उपविभागीय अधिकारी ज्योती कावरे,यांच्यासह जिल्ह्यातील नद्यांनिहाय नियुक्त समन्वयक सर्वश्री उदय थोरात, सुनिल मेंढेकर (वालदेवी नदी), योगेश बर्वे, दिपक बैरागी (कपिला नदी), प्रा. सोमनाथ मुढाळ, चंदन खेतेले (नंदिनी नदी), डॉ. वाळिबा रूपवते, संपतराव देशमुख (म्हाळुंगी नदी), मनोज साठ्ये, प्रशांत परदेशी (मोती नदी) आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, या अभियानात सर्वप्रथम नदीलगतच्या गावांना प्रत्यक्ष भेटी देवून स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, सरपंच व गावकरी यांच्याशी संवाद प्रबोधनपर अभियानाचे आयोजन करणे गरजेचे आहे. या संवादातून नद्यांच्या संर्वधानासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजनांबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहचेल व यातून परिणामी गावकर्‍यांचा सहभाग निश्चितच वाढणार आहे.

यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व गटविकास अधिकारी यांच्यामार्फत लोकसंवादाचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी यावेळी दिल्या. नदी बंधारे व अनुषंगिक कामांसाठी महात्मा फुले जलजीवन अभियान, जिल्हा नियोजन समिती यातून आवश्यक निधीची तरतूद करता येईल.

अभियानात सहभाग असलेल्या नद्या

  • वालदेवी नदी

  • कपिला नदी

  • नंदिनी नदी

  • म्हाळूंगी नदी

  • मोती नदी

गेली अनेक दशके शासन-प्रशासन स्तरावर विविध उपक्रमांच्या माध्यमातून नद्यांच्या जतन व संवर्धनावर आपण काम करतो आहोत. चला जाणुया नदीला या अभियानाला प्रत्येकाने केवळ शासकीय उपक्रम म्हणून न पाहता त्याकडे नागरीक म्हणून असलेल्या कर्तव्य भावनेतून पाहायला हवे. प्रत्येकाने या अभियानातून नदीसाक्षर होण्याचा संकल्प केल्यास खर्‍या अर्थाने आपल्या नद्या अमृतवाहिन्या होतील. नदीपात्राची होणारी धूप, नदी प्रदूषण, नदीची स्वच्छता याबबात जनजागृती, अभ्यासपर लोकशिक्षण व प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. नद्यांची धूप थांबविण्यासाठी नदी पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे गरजचे आहे.

- डॉ. चंद्राकांत पुलकुंडवार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com